स्व. संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी सचिन सोमवंशी यांचे आगळावेगळे आंदोलन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/०१/२०२५
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी बिड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्यावर हल्ला चढवून अमानुषपणे खुन केल्याची घटना घडली आहे. या स्वर्गीय संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना व कटात सामील असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारांना कठोर शासन होऊन स्वर्गीय संतोष देशमुख व त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी व या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक सचिन सोमवंशी यांनी त्यांच्या वाढदिवशी पाचोरा येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषणाला बसणार असल्याचे जाहीर केले आहे.
तसेच या माझ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी उपोषणस्थळी येऊन आपला पाठिंबा जाहीर करावा असे आवाहन केले असून मी वाढदिवसाच्या दिवशीच हे आंदोलन करत आहे व आपण या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घेतांना मला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी हार, गुच्छ आणू नयेत आपण माझा उपोषणस्थळी येऊन जो पाठिंबा द्याल त्याच माझ्यासाठी लाख मोलाच्या शुभेच्छा असतील असे मत व्यक्त केले आहे.