सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • भडगाव, पाचोरा बोगस शिक्षक भरतीचा महाघोटाळा उफाळला; दलाल–अधिकारी संगनमताचा पर्दाफाश, SIT व आर्थिक गुन्हे शाखेकडे चौकशीची मागणी.

  • पिंपळगाव हरेश्र्वर ग्रामविकास विद्यालयातील भरतीवर वाद आरक्षण नियम न पाळल्याचा आरोप; प्रकरण हायकोर्टात.

  • गर्भपात करतांना बंदी असलेल्या औषधांचा वापर, डॉक्टरला अटक, मात्र संबंधित औषध विक्रेता मोकाटच.

  • पोलिस काकाकडून अल्पवयीन पुतणीवर अत्याचार; गर्भपात करणाऱ्या डॉक्टरला अटक.

  • लोहारा गावातील ‘करवंदाच्या’ झाडाखाली उघडपणे गुटखा विक्री सुरुच; कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›राज्यात दुध भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम सुरु.

राज्यात दुध भेसळ रोखण्यासाठी धडक मोहीम सुरु.

By Satyajeet News
January 17, 2025
0
0
Share:
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/०१/२०२५

दुध हे पूर्ण अन्न आहे व आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. परंतु सद्यस्थितीत दुधातील भेसळीचे प्रकार राज्यात निदर्शनास येत आहेत. म्हणून अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ ची अंमलबजावणी करुन राज्यातील नागरिकांना सकस व निर्मळ अन्नपदार्थ उपलब्ध करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे.

याचाच एक भाग म्हणून दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ करणाऱ्यांवर जरब बसविण्याकरीता व भेसळ रोखण्यासाठी तसेच राज्यातील जनतेला उपलब्ध होणारे दुध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस तसेच अन्न व औषध प्रशासन मंत्री मा. नरहरी झिरवाळ, आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनामार्फत संपूर्ण राज्यात व्यापक स्वरूपात मोहीम राबविण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे.

या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी राज्यभर विविध ठिकाणी मोहीम राबविण्यात आली असून या मोहिमेत ठिकठिकाणी दुधाचे सर्वेक्षण नमुने घेऊन त्यांचा गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी एकुण १०३ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या होत्या. या सुचनेनुसार राज्यभरातील अन्न व सुरक्षा अधिकाऱ्यांनी दुध उत्पादक, दुध वितरक, विक्रेते व रस्त्यांवरील विक्री केंद्रावरुन १०६२ दुधाचे नमुने सर्वेक्षण विश्लेषणाकरीता घेतले असून यात राज्यात विविध ब्रांडचे दुधाचे ६८० पिशव्या (पाऊच) पॅकिंग मधुन व ३८२ सुट्या स्वरुपातील दुधाच्या नमुन्यांचा समावेश आहे.

सदरचे घेतलेले दुधाचे नमुने अन्न सुरक्षा व मानके प्राधिकृत अन्न प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून या दुधामध्ये भेसळ, रसारनांचे प्रमाण व दुधाच्या गुणवत्तेची तपासणी केली जाईल. सदर सर्वेक्षण नमुने विश्लेषणांती दुधाच्या नमुन्यांमध्ये भेसळ आढळून आल्यास सदर आस्थापनेमधुन तात्काळ कायदेशीर नमुने घेऊन संबंधित उत्पादक व पुरवठादार यांचेवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार तात्काळ कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनामार्फत अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
**************************************************
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त, राजेश नार्वेकर.
**************************************************
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी याविषयी बोलताना सांगितले की, “दूधातील भेसळ ही गंभीर समस्या आहे. नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठी मुख्यमंत्री तसेच विभागाचे मंत्री राज्यमंत्री यांनी दुध भेसळ हा विषय गांभीर्याने घेतला असून भेसळ करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुषंगाने आज राज्यभरात दुधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविण्यात आली आहे.

सदर नमुन्यांमध्ये भेसळ आढळल्यास तात्काळ संबंधित दुधाचे विक्रेते. पुरवठादार व उत्पादक यांचे विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच अशाप्रकारच्या मोहिमा वारंवार घेण्यात येतील. तसेच या मोहिमेसाठी नागरिकांचे सहकार्य अपेक्षित असून दुधात किंवा दुग्धजन्य पदार्थांमध्ये भेसळ आढळून आल्यास अन्न व औषध प्रशासनाच्या [१८००२२२३६५] हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा [email protected] या ईमेलवर किंवा https://foscos.fssai.gov.in/consumergrievance या पोर्टलवर तक्रार नोंदवावी. असे आवाहन केले आहे.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Post Views: 249
Previous Article

स्व.‌ संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी ...

Next Article

मुक्तानंद गॅस एजन्सीच्या मनमानी कारभारामुळे, अंबे वडगाव ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची उत्सूकता शिगेला पण ?

    November 15, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    चार महिन्यांपासून पगार नसल्याने दत्त माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकांवर मोलमजुरी करण्याची वेळ.

    October 12, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    रुढी, परंपरेच्या नावाखाली विकृतीचा कळस, अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर खेळला जातोय जुगार.

    April 28, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    डॉ. टाक खंडणी प्रकरणी पाचोरा अहिर सुवर्णकार मंडळातर्फे पोलीसांना निवेदन.

    July 26, 2025
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात महिलाराज नावाला आणि पतिराज छळतात गावाला.

    November 26, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यात २१५ पशुधन लंम्पी (बाधित) सक्रिय, युध्दपातळीवर लसीकरण मोहीम सुरु.

    October 10, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorizedआरोग्य

    पाचोरा बसस्थानकात मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न.

  • राजकीय

    जळगाव शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदी ऊध्दव भाऊ मराठे.

  • आपलं जळगाव

    विद्यूत वितरणचे कर्मचारी चारतात उंटावरून शेळ्या, विद्यूत ग्राहक मात्र वाजवत बसतात टाळ्या.

दिनदर्शिका

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज