वेरुळी खुर्द येथील शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने अकस्मात मृत्यू.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२५
सद्यस्थितीत विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार सुरु असून कृषी विभागाला विद्युत पुरवठा करतांना शेतकऱ्यांच्या सोयीनुसार पुर्ण दाबाने तसेच दिवसा विद्युत पुरवठा केला जात नाही व विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे. अशाही परिस्थितीत शेतकरी जिवापाड मेहनत करुन आपली पिके जगविण्यासाठी धडपड करत असतो.
असाच अनेक अडचणींचा सामना करत वेरुळी खुर्द येथील शेतकरी भैय्या रमेश पाटील वय वर्षे ३९ हा त्याच्या शेतातील गहू पिकाला पाणी देत असतांनाच दिनांक १२ जानेवारी २०२५ रविवार रोजी दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास भैय्या याला विजेच्या प्रवाहाचा जोरदार धक्का बसला म्हणून त्याला पाचोरा येथील पाचोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीकारी यांनी भैया याला मृत घोषित केले.
या घटनेबाबत पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल मल्हार देशमुख हे पुढील तपास करीत आहेत.
मृत भैय्या पाटील हा तरुण अविवाहित असून त्याचा पाश्चात्य आई वडील एक बहिण आहे. या घटनेची माहिती मिळताच वेरुळी खुर्द गावात शोककळा पसरली आहे.