पाचोरा येथील बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे खाजगीकरण झाल्याची चर्चा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२५
पाचोरा शहरातील बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे खाजगीकरण झाल्याची जोरदार चर्चा संपूर्ण पाचोरा तालुक्यातील खेड्यापाड्यात ऐकावयास येत असून या कार्यालयात काम करणारे काही कर्मचारी पाचोरा तालुक्यातीलच असल्याने बजाज फायनान्स कंपनीकडून ऑफर असल्यावर दोन , दोन दिवस कार्यालयात बोलावून घेत ऑनलाईन कागदपत्रांची पुर्तता केल्यावर सुध्दा ऐनवेळी वैयक्तिक फायद्यासाठी किंवा वैयक्तिक नाराजीतून कर्ज नामंजूर करत असल्याचे सांगितले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की बजाज फायनान्स कंपनीकडून एका ग्राहकाला भ्रमणध्वनीवर संपर्क साधुन तुम्हाला बजाज फायनान्स कंपनीकडून ऑफर आली असून आपणास कर्ज घ्यायचे असल्यास आधारकार्ड, पॅनकार्ड घेऊन पाचोरा येथील कार्यालयात या असे सांगितले व सोबतच कर्जाची रक्कम व परतफेड कशी करावी लागेल हे समजून सांगितले होते.
ही माहिती मिळताच संबंधित गरजू व्यक्तींने कर्ज घेण्यासाठी आधार कार्ड, पॅनकार्ड घेऊन पाचोरा येथील कार्यालयात जाऊन कार्यालयातील प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे सर्व डाक्युमेंट देऊन कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर बजाज फायनान्स कंपनीकडून संबंधित कर्ज घेणाऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन घराची छायाचित्रे काढून घेत देण्यात आलेल्या ऑफर प्रेमाने तुमच्या खात्यामध्ये ७३०००/०० रुपये जमा होतील ते तुम्ही केव्हाही काढून घेऊ शकतात असे सांगितले होते.
बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयातील प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे गरजू ग्राहक हा आपल्या खात्यात ७३०००/०० रुपये येणार आहेत म्हणून दुसऱ्या दिवशी बॅंकेत गेल्यावर आपल्या खात्यावर काही रक्कम आली आहे का ? याची माहिती घेतली परंतु खात्यावर पैसे आले नसल्याने आज नाहीतर उद्या येतील या आशेवर संबंधित इसम घरी परतला. परंतू दुसऱ्या दिवशीही खात्यावर पैसे आले नसल्याने संबंधित ग्राहकाने कार्यालयातील संबंधित प्रतिनिधींला फोन करुन विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देऊन त्याला टाळण्यात आले.
विशेष म्हणजे बजाज फायनान्स कंपनीकडून ऑफर असल्यावर संबंधित गरजू व्यक्तींने बजाज फायनान्स कार्यालयात जाऊन कंपनीच्या अटी, शर्ती प्रमाणे सर्व पूर्तता केली व कंपनीकडून कर्ज मंजूर झाल्याचा तसा संदेश मोबाईलवर प्राप्त झाला माग ऐनवेळी कर्ज देण्यासाठी का नाकारण्यात आले याबाबत सविस्तर माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या धक्कादायक प्रकाराबाबत सविस्तर माहिती अशी की बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयात त्याच्याच गावचा व ओळखीचा व्यक्ती काम करत असून त्याने वैयक्तिक नाराजीतून संबंधित कर्ज घेणाऱ्या व्यक्तीबद्दल खोटी माहिती देऊन कर्ज नाकारले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. म्हणून बजाज फायनान्स कंपनीच्या कार्यालयाचे खाजगीकरण झाल्याची शंका संबंधित ग्राहकाने उपस्थित केली आहे.