अंबे वडगाव गृप ग्रामपंचायत व गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ जानेवारी रोजी भव्य आरोग्य शिबीर.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गृप ग्रामपंचायत व गोदावरी फाऊंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ जानेवारी २०२५ सोमवार रोजी अंबे वडगाव येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर सकाळी १० वाजेपासून तर दुपारी ०२ वाजेपर्यंत
भव्य आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या आरोग्य रोगनिदान शिबीराचे प्रमुख पाहुणे म्हणून पाचोरा, भडगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार मा. श्री. किशोर आप्पा पाटील हे उपस्थित राहणार असून या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य मा. श्री. मधुकर भाऊ काटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. शालिग्राम मालकर, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस मा. श्री. प्रकाश काळे साहेब, अरुण पवार, डॉ. मुन्ना पठाण, सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणार आहेत तरी या शिबिराचा जास्तीत, जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन अंबे वडगाव गृप ग्रामपंचायतीचे सरपंच मा. श्री. बबलू तडवी, उपसरपंच श्रीमती लताबाई चव्हाण यांनी केले आहे.
या शिबिरासाठी डॉ. उल्हास पाटील माजी खासदार, सचिव सौ. वर्षाताई पाटील कार्डिओलॉजिस्ट डॉ. आशिष भिरुड, रत्नशेखर जैन हे उपस्थित राहणार असून धनदाई कृषी केंद्राचे संचालक मा. श्री. संजय देवरे, सत्यजित न्यूजचे संपादक मा. श्री. दिलीप जैन, मालखेडा येथील सामाजिक कार्यकर्ते मा. श्री. चरणदास राठोड यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे.
या आरोग्य रोगनिदान शिबीरात, मुतखडा मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्ताशय खडा, स्वादुपिंड, छोट्या गाठी, मुळव्याध, हायड्रोसिल, अंडाशय शस्त्रक्रिया, भगंदर, पित्ताशयाचे खडे, पायातील शिरा फुटणे मुत्रपिंडाचे आजार पोट व आतड्यांच्या शस्त्रक्रिया, कर्करोग तपासणी व उपचार, बालरोग शस्त्रक्रिया, मेंदू, मणका, फॅक्चर, डोळे तपासणी, डोळ्यांचे आजार, हृदयरोग, जनरल मेडिसीन, गर्भपीशवीचे आजार, अस्थिरोग, मानसोपचार, इत्यादी आजारांची तपासणी व मोफत उपचार करण्यात येणार आहेत.
विशेष म्हणजे या शिबिरात E.C.G. कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी ASD/VSD हृदयाला असलेले छिद्र बिना ऑपरेशन बंद करण्यात येईल, मोफत एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया 2D इको पेस मेकर रीनल एन्जिओप्लास्टी DVT IVC Filter बलुन मायट्रल वॉल्व्होटॉमी ओपन हार्ट बायपास सर्जरी, बीटिंग हार्ट बायपास सर्जरी, व्हॉल्व रिप्लेसमेंन्ट आणि द्रुस्ती, जन्मजात रोग (हृदयाचे छिद्र) या आजारांवरही मोफत उपचार करण्यात येणार आहेत. म्हणून गरजूंनी रेशनकार्ड व आधार कार्ड ओरिजनल सोबत घेऊन यावे अशी सूचना करण्यात आली आहे.