सत्यजित न्यूजच्या वृत्ताचा विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका, विद्युत चोरट्यांवर कारवाईचा उगारला बडगा.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१०/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावात “अनेकांना अनाधिकृत विद्युत कनेक्शन जोडून देणारा, कुऱ्हाड खुर्द गावात बिन पगारी, फुल अधिकारी तो कोण ? ” या मथळ्याखाली सत्यजित न्यूजच्या माध्यमातून दिनांक ०४ जून २०२५ शनिवारी रोजी वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. तसेच विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी मुख्यालयात रहात नाहीत असे नमूद केले होते. हे वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीमचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले व त्यांनी नुकतीच कुऱ्हाड खुर्द गावातील विद्युत चोरट्यांवर कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.
या विद्युत वितरण कंपनीकडून करण्यात आलेल्या कारवाई बाबत सविस्तर माहिती अशी की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र कुऱ्हाड गावच्या परिसरातील कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड बुद्रुक तांडा व आसपासच्या वाड्यावस्त्यांवर इतर भागात विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी केली जात होती.
यामुळे वारंवार विद्युत पुरवठा खंडित होणे, ट्रान्सफॉर्मर मध्ये वारंवार बिघाड होण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे अधिकृत विद्युत ग्राहकांनी हे गाऱ्हाणे विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यावरही काहीच कारवाई केली जात नव्हती म्हणून कुऱ्हाड गावच्या त्रस्त विद्युत ग्राहकांनी हे गाऱ्हाणे सत्यजित न्यूजकडे मांडल्यानंतर सत्यजित न्यूजच्या माध्यमातून याबाबत आवाज उठवला गेला होता.
हे सत्यजित न्यूजच्या माध्यमातून “कुऱ्हाड खुर्द गावात बिन पगारी, फुल अधिकारी तो कोण” ? या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. हे वृत्त प्रकाशित होताच विद्युत वितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी खडबडून जागे झाले व त्यांनी काल दिनांक ०९ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून कुऱ्हाड खुर्द, कुऱ्हाड बुद्रुक, कुऱ्हाड तांडा व परिसरात ठिकठिकाणी धाडसत्र राबवून विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून विद्युत चोरी करणाऱ्यांच्या केबल वायर काढून घेत रितसर पंचनामा करुन त्या जप्त करुन घेत संबंधित विद्युत चोरट्यांना दंडात्मक बिलाची आकारणी केली आहे.
ही कारवाई विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ संदिप पाटील, सहाय्यक अभियंता रविंद्र पाटील, सुरेश चौधरी, वरखेडी कार्यक्षेत्राचे सहाय्यक अभियंता निसार तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत सहायक अल्केश माहोर, गणेश शिंदे, अमोल बोरसे, अविनाश तेली या पथकाने काटेकोर पार पडली.
*************************************************
विद्युत चोरट्यांवर कारवाई सुरुच रहाणार, सहाय्यक अभियंता निसार तडवी.
*************************************************
वरखेडी कनिष्ठ अभियंता कार्यक्षेत्रात येणाऱ्या प्रत्येक गावात विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून किंवा अन्य कोणत्याही मार्गाने विद्युत चोरी करणाऱ्यांवर कारवाई करणे सुरुच राहणार असल्याचे कनिष्ठ अभियंता निसार तडवी यांनी यावेळी सांगितले.