जिल्हा परिषदेकडून दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांना १४५०१/०० रुपये दरमहा भाडे भरण्याचे आदेश.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या लोहारी येथील बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाच्या संचालकांनी लोहारी येथील जिल्हापरिषद शाळेच्या शालेय शिक्षण समितीला व गावातील काही प्रतिष्ठित लोकांना हाताशी धरुन जिल्हा परिषदेकडून कोणत्याही प्रकारची रीतसर कागदोपत्री पुर्तता न करता व रितसर परवानगी न घेताच लोहारी येथील जिल्हापरिषदेच्या मराठी मुलांच्या शाळेवर सन २०१९ पासून कब्जा करुन घेत सन २०२५ पर्यंत एक रुपयाही भाडे न दिलेले नव्हते व दिलेले नाही.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता लोहारी येथील जिल्हा परिषदेची मराठी मुलांची शाळा चांगल्याप्रकारे सुरु असताना याच शाळेत गोरगरिबांच्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून पुढील वर्ग सुरु करण्यासाठी हालचाली सुरु असतांनाच शिक्षण समितीचे अध्यक्ष, सदस्य व गावातील काही लोकांना हाताशी धरुन बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन पाचोरा संचलित दत्त माध्यमिक विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष यांनी या जिल्हापरिषद मराठी मुलांच्या शाळेत अनाधिकृतपणे ताबा घेऊन त्याठिकाणी दत्त माध्यमिक विद्यालय सुरु केले आहेत.
ही लोहारी येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची इमारत बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन या संस्थेला भाड्याने दिल्यानंतर बांधीव इमारत व शाळेसमोर असलेल्या पटांगणाचे स्क्वेअर फुटांचे मोजमाप करुन योग्य ती भाडे आकारणी करण्यात यावी अशी मागणी केली होती. परंतू संबंधित संस्थाचालक, जिल्हा परिषदेचे व पंचायत समितीचे जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जागेचे मोजमाप करुन भाडे आकारणी करण्यात दिरंगाई केली होती. म्हणून सद्यस्थिती ग्रामपंचायतीवर कार्यरत असलेल्या सरपंच, सदस्य व काही सुज्ञ नागरिकांनी सतत पाठपुरावा करुन संबंधित विभागाला भाडे आकारणी करण्यासाठी भाग पाडले असून आता बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशन या संस्थेला सन २०१९ पासून आजपर्यंत म्हणजे सन २०२५ पर्यंत दरमहा १४५०१/०० रुपये भाडे आकारणी करुन ते त्वरित भरण्याचे आदेश दिले आहेत.
मात्र आदेश होऊनही आजपर्यंत बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून लोहारी येथील जिल्हा परिषद शाळेची इमारत ताब्यात घेतल्यापासून तर आजपर्यंत भाडे आकारणी करण्यात येऊ नये म्हणून संबंधित विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन भाडे आकारणी करण्यात येऊ नये म्हणून चालढकल केली जात होती असे खात्रीलायक वृत्त आहे.
परंतू मागील महिन्यात जिल्हा परिषदेने दरमहा १४५०१/०० रुपये भाडे आकारणी केल्यामुळे एकाबाजूला लवकरात, लवकर भाडे वसूल करण्यात यावे अशी मागणी केली जात असतांनाच दुसरीकडे भाडे आकारणीचा आकडा पाहून बिस्मिल्ला मल्टिपर्पज फाउंडेशनच्या अध्यक्षांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते आता भाडे आकारणी कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती समोर येत आहे.
मात्र जिल्हा परिषदेच्या ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाडे आकारणी केली आहे ती आम्हाला मान्य नसून इमारत व जागेची ऐसपैस जागा व सुखसुविधा पहाता दरमहा १४५०१/०० रुपये भाडे हे तोडक्या स्वरुपाचे असल्याचे मत व्यक्त करत दरमहा २१०००/०० रुपये भाडे आकारणी करण्यात यावी अशी मागणी सुज्ञ नागरिक केली आहे.