जामने ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अर्चना पाटील यांची बिनविरोध निवड.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०७/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील जामने, सार्वे गृप ग्रामपंचायत असून या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ. अर्चना संजय पाटील यांची आज दिनांक ०७ जानेवारी २०२५ सोमवार रोजी सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथून जवळच असलेल्या जामने ग्रामपंचायतीवर सौ. कल्पना धनराज पाटील ह्या सरपंचपदी कामकाज पाहत होत्या. परंतू त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता. म्हणून या त्यांच्या रिक्त जागेवर सौ. अर्चना संजय पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बापुजी पाटील, शरद पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील, श्रीराम पाटील, महादू पाटील, जामने गावचे पोलीस पाटील, ग्रामविस्तार अधिकारी प्रशांत पाटील, रामकृष्ण पाटील, नगराज पाटील व असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
या निवडणुकीत निर्णय अधिकारी म्हणून महेंद्र पाटील (सर्कल) यांनी काम पाहिले.