गरुड महाविद्यालयात संवर्धन ऋतुमती अभियानाचे उद्घाटन संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०५/०१/२०२५
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव व आप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियाना चे उद्घाटन आज संपन्न झाले.
या अभियानाअंतर्गत “मासिक पाळीच्या वेळी महिलांनी घ्यावयाची काळजी“ या विषयावर डॉ. रोहिणी गरुड मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र यांचे व्याख्यान आयोजित करण्यांत आले होते. मुलींनी या काळात स्वतःला कसे जपावे स्वछत कशी राखावी यासंदर्भात मार्गदर्शनासाठी आजचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या प्रमुख वक्त्या म्हणजेच डॉ. रोहिणी गरुड मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र शेंदुर्णी , यांनी विद्यार्थिनींच्या प्रश्नांना उत्तर देत त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्यांच्या समवेतच राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती जयश्री पाटील मॅडम यांनी आजच्या धकाधकीच्या काळात महिला आरोग्य संवर्धन ही काळाची गरज आहे सांगत मार्गदर्शन केले व विद्यार्थिनींना योगा करून स्वतःला सदृढ बनविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे यांनी अध्यक्षीय मनोगतात विद्यार्थिनीला महाविद्यालयांत शिक्षण घेत असतांना येणाऱ्या शारीरिक अडचणी सोडविण्यासाठी स्वतः काळजी घेण्याचा सल्ला दिला. तसेच महाराष्ट्र माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र महाराष्ट्र शासन यांच्या करिअर कट्ट्याच्या वतीने “आधुनिक सावित्री २०२५” हा पुरस्कार डॉ. योगिता चौधरी यांना जाहीर झाल्या बद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विकास अधिकारी डॉ. योगिता चौधरी यांनी केले तर आभार कु. मयूरी गुजर, सूत्र संचालन कु. प्राजक्ता माळी आणि साक्षी चौधरी यांनी केले. कार्यक्रमास विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.