अनेकांना अनाधिकृत विद्युत कनेक्शन जोडून देणारा, कुऱ्हाड खुर्द गावात बिन पगारी, फुल अधिकारी तो कोण ?

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/०१/२०२५
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड खुर्द गावात मोठ्या प्रमाणात विद्युत चोरी सुरु असून ही विद्युत चोरी करण्यासाठी विद्युत चोरांनी तसेच कुऱ्हाड गावात रहात असलेल्या एका बिनपगारी व फुल अधिकारी, इसमाने थेट विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून तसेच काही परिसरात विद्युत चोरी थांबण्यासाठी टाकलेल्या विद्युत केबल मध्येच कट करुन किंवा अधिकृत विद्युत ग्राहकांना विद्युत कनेक्शन जोडून देण्यासाठी ठिकठिकाणी असलेल्या छोट्या, छोट्या विद्युत पेट्या मधून अनाधिकृतपणे कनेक्शन जोडून देत परस्पर हप्ते वसूली करुन दरमहा हजारो रुपये कमाई करत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी हे मुख्यालयात रहात नसल्याने कुऱ्हाड ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने ऐनवेळी विद्युत पुरवठा खंडित झाला किंवा काही तांत्रिक बिघाड झाल्यास गरजवंत विद्युत ग्राहकांना आपले काम वेळेवर करुन घेण्यासाठी कुणाचीतरी मदत घ्यावी लागते. याचाच फायदा घेत कुऱ्हाड गावातील एका इसमाने स्वताकडे कोणत्याही प्रकारचे तंत्रज्ञान अवगत नसतांना किंवा विद्युत वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची नेमणूक केली नसतांना विद्युत ग्राहकांच्या अडचणी सोडविण्यासाठी ट्रान्सफॉर्मर वर चढणे, तांत्रिक बिघाड दुरुस्त करणे ही कामे करत असतांनाच अनाधिकृत विद्युत कनेक्शन जोडून देणे व पैसे उकळणे हा गोरखधंदा सुरु केला असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे हे अनाधिकृत विद्युत कनेक्शन जोडून देण्यासाठी विद्युत वितरण कंपनीकडून कोणत्याही प्रकारची रितसर परवानगी घेतली जात नसल्याने कुऱ्हाड खुर्द येथील बसस्थानक परिसरात सुरु असलेल्या अवैध धंदे करणाऱ्या व्यवसायीकांनी या बिन पगारी फुल अधिकारी इसमाकडून विद्युत कनेक्शन जोडून घेतले आहे. या जोडण्यात अलेले शेकडो विद्युत कनेक्शनमुळे ट्रान्सफॉर्मर अतिरिक्त भार पडत असल्याने विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत आहे.
म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कुऱ्हाड खुर्द गावातील बिन पगारी फुल अधिकारी असलेल्या ईसमावर तसेच अनाधिकृत विद्युत कनेक्शन जोडून घेणारे तसेच विद्युत वाहिनीच्या तारांवर आकोडे टाकून विद्युत चोरी करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी अधिकृत विद्युत ग्राहकांनी व सुज्ञ नागरिकांनी केली आहे.