पाचोरा शहरात कारवाई केली तरीही, शिंदाड व पिंपळगाव हरेश्वर येथे वाहनांमध्ये गॅस भरणे सुरुच.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/०१/२०२५
[पकड़ा गया और चोर है, बाकी सब शिर जोर हैं]
पाचोरा शहरातील जारगाव चौफुली जवळ घरगुती गॅस बेकायदेशीररित्या वाहनांमध्ये भरतांना एकास तीन लाख साठ हजार रुपयांहून अधिक मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई दिनांक जानेवारी २०२५ बुधवार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे राहुल शिंपी व पुरवठा निरीक्षक अभिजित येवले यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाणके हे करीत आहेत.
असे असले तरी आजही जळगाव शहरासह जिल्ह्यातील बऱ्याचशा लहानमोठ्या गाव, खेड्यापाड्यात स्वयंपाकाच्या गॅसच्या हंड्या अधिकृत गॅस वितरकांशी संधान साधून सर्व नियम धाब्यावर बसवून हंड्या विकत घेऊन वाहनांमध्ये भरुन देण्याचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. या गोरखधंद्यात जास्तीत, जास्त इंण्डेन कंपनीच्या व काही प्रमाणात एच. पी. व भारत कंपनीच्या गॅस हंड्या (सिलिंडर) ठिकठिकाणी आढळून येत आहेत.
असाच काहीसा प्रकार पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शिंदाड व खुद्द पोलीस स्टेशनपासून थोड्याच अंतरावर विशेष म्हणजे रहदारीच्या रस्त्यावर व भरवस्तीत हा वाहनांमध्ये गॅस भरुन देण्याचा गोरखधंदा राजरोसपणे, दिवसाढवळ्या सुरु असून शिंदाड गावात तीन व पिंपळगाव हरेश्वर गावात तीन ठिकाणी स्वयंपाकाच्या गॅसच्या हंड्या (सिलिंडर) मधील गॅस वाहनांमध्ये भरुन देण्याचा अनाधिकृत व्यवसाय सुरु आहे. तसेच काही वाहन मालकांनी स्वताच्या घरीच वाहनांमध्ये गॅस भरुन घेण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
विशेष म्हणजे हा वाहनांमध्ये गॅस भरुन देण्याचा व्यवसाय भरवस्तीत, रहदारीच्या रस्त्यावर चोवीस तास सुरु असल्याने वाहनात गॅस भरतांना एखाद्यावेळी अपघात होऊन मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शिंदाड येथील तीन व पिंपळगाव हरेश्वर येथील तीन ठिकाणी पाचोरा पुरवठा अधिकारी व पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी संयुक्तपणे धाडसत्र राबवून हा वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस भरण्याचा गोरखधंदा कायमस्वरुपी बंद करावा अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे.