पाचोरा, भडगाव विधानसभेची भाजपा संघटन पर्व सभासद नोंदणी अभियान कार्यशाळा पाचोरा येथे संपन्न
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२५
भारतीय जनता पार्टी पाचोरा, भडगाव विधानसभेची सभासद नोंदणी अभियान कार्यशाळा आज दिनांक ०२ जानेवारी २०२५ गुरुवार रोजी भाजपा जळगाव पश्चिम जिल्हाध्यक्ष ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, भाजपा सदस्य नोंदणी अभियानचे उत्तर महाराष्ट्रचे सहसंयोजक डॉ. राधेश्याम चौधरी व पाचोरा, भडगाव विधानसभेचे प्रभारी के. बी. दादा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोरा येथील बनोटीवाला फार्म हाऊस येथे संपन्न झाली.
या बैठकीत एक जानेवारी ते पंधरा जानेवारी या पंधरवड्यात प्रत्येक गावात, प्रत्येक बुथवर दोनशे सभासद नोंदणीचे उदिष्ट ठरवण्यात आले असून त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक गावात प्रत्येक बुथवर भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिनांक ०५ जानेवारी २०२५ रविवार रोजी स्टॉल लावून दोनशे सभासद नोंदणी करायचे असे ठरवण्यात आले.
पाचोरा, भडगाव विधानसभेची भाजपा संघटन पर्व सभासद नोंदणी अभियान कार्यशाळेत ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, डॉ. राधेश्याम चौधरी, के. बी.दादा साळुंखे, मधु भाऊ काटे, अमोल नाना पाटील, सुभाष पाटील, कांतीलाल जैन, नंदू बाप्पु सोमवंशी,अनिल पाटील, गोविंद शेलार, प्रमोद सोमवंशी सुनील पाटील, प्रकाश महाजन,लक्ष्मण पाटील, भगवान पाटील, प्रमोद पाटील, विकास पाटील, दिगंबर पाटील, सुनील राठोड, शिवाजी पाटील, किरण पाटील, विजय वाणी, प्रदीप कोळी, मनोहर चौधरी, गणेश पाटील, योगेश माळी, शरद पाटील, महेश पाटील, सागर नेताजी, गोविंद देवरे, निलेश पाटील, विलास पाटील, किशोर संचेती, महेश पाटील, बंटी राठोड, स्वप्नील पाटील गौरव पाटील विवेक पाटील, उस्मान मामू, विनोद महाजन गोलू पाटील, व पाचोरा भडगाव विधानसभेतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यशाळेचे प्रास्ताविक अमोल नाना पाटील यांनी तर सूत्रसंचालन गोविंद शेलार व आभार प्रदर्शन अनिल पाटील यांनी केले.