घरगुती गॅसचा वाहनात वापर, पाचोरा येथे एकास अटक, वाहनचालकांचे धाबे दणाणले.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/०१/२०२४
पाचोरा शहरातील जारगाव चौफुलीजवळ घरगुती गॅस बेकायदेशीररित्या वाहनामध्ये भरतांना एकास तीन लाख साठ हजार रुपयांहून अधिक मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून ही कारवाई दिनांक जानेवारी २०२५ बुधवार रोजी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा शाखेचे राहुल शिंपी व पुरवठा निरीक्षक अभिजित येवले यांनी केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चव्हाण के हे करीत आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा येथील जारगाव चौफुली ते भडगाव रस्त्यावर असलेल्या रामदेव लॅन्स कडे जाणाऱ्या वळणाजवळ कुऱ्हाड येथील रहिवासी ब्रिजेश हिंमत जाधव वय वर्षे (२२) हा सार्वजनिक ठिकाणी मानवी जीव धोक्यात येईल अगर इतर व्यक्तीला दुखापत अगर नुकसान होऊन जीवितहानीचा संभव निर्माण होईल अशा पद्धतीने घरगुती जीवनावश्यक स्वयंपाकाच्या एच. पी. व इन्डेन कंपनीच्या हंड्या बेकायदेशीरपणे बाळगून इलेक्ट्रीक मोटारीच्या साह्याने वाहनामध्ये भरतांना मिळून आला.
म्हणून ब्रिजेश हिंमत जाधव याला दोन इलेक्ट्रीक मोटारी, चार भरलेले व एक रिकामे गॅस सिलिंडर, एक इको कंपनीची व्हॅन, रबरी नळ्या असा एकूण ३६००००/०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत साहित्यासह ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात त्याच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.