पाचोरा वकिल संघाच्या उपाध्यक्षपदी कविता मासरे (रायसाकडा).
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/१२/२०२५
पाचोरा वकिल संघाच्या उपाध्यक्ष पदासाठी कोणताही प्रतिस्पर्धी नसल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. ही निवड पाचोरा तालुक्यातील वकील वर्तुळात आनंदाचे वातावरण निर्माण करणारी ठरली आहे. येत्या ३१ डिसेंबर रोजी ही निवडणूक पार पडणार आहे मात्र उपाध्यक्ष पदासाठी कविता मासरे यांच्या विरोधात कोणताही फॉर्म नसल्याने कविता मासरे (रायसाकडा) यांची बिनविरोध निवड झाली असून पाचोरा वकिल संघाच्या इतिहासात प्रथमच महिला उपाध्यक्ष होण्याची संधी कविता मासरे यांना मिळाली आहे.
कविता मासरे यांनी वकील म्हणून आपल्या कारकिर्दीत अनेक यशस्वी प्रकरणे हाताळली आहेत. त्यांच्या या क्षमतेबद्दल वकील वर्तुळात मोठे समाधान आहे. त्यांच्या निवडणुकीमुळे वकील संघाला नवी ऊर्जा मिळणार असून, त्यांच्या नेतृत्वाखाली वकील संघ अधिक प्रभावीपणे काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांनी ही पत्र देउन शुभेच्छा दिल्या.
ॲड. कविता मासरे, ह्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर रायसाकडा यांच्या धर्मपत्नी आहेत.