तंबाखू , गुटखा खाताय तर पाच हजार रुपये तयार ठेवा, व्यसन करणाऱ्या पोलीसांवर शिस्तभंगाची कारवाई होणार.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२८/१२/२०२४
अंगावर गणेश असतांना तसेच कार्यालयात सेवा बजावत असतांना कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडे तंबाखू, गुटखा, दारु, सिगारेट जवळ आढळून आल्यास पोलीसांवर तात्काळ शिस्तभंगाची कारवाई करल ५०००/०० रुपये दंडाची शिक्षा करण्यात येणार आहे. कारण पोलीसांमध्ये तंबाखू व गुटख्याचे व्यसन करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असून पोलीसांमध्ये व्यसनाधीता वाढत चालली आहे. यामुळे हे व्यसनाधीन अधिकारी व कर्मचारी तंबाखू, गुटखा खाऊन कार्यालयाच्या भिंतीवर, बाथरुममध्ये, व झाडांच्या कुंड्या किंवा कार्यालयाच्या परिसरात पिंक (पिचकारी) मारतात. यामुळे पोलीस कार्यालयाचा परिसर खराब व दुर्गंधीयुक्त होतो तसेच याचे दुष्परिणाम आरोग्यावरही होतात. म्हणून हा सगळा प्रकार थांबविण्यासाठी पोलीस आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी एक आदेश काढला आहे.
या आदेशानुसार अंगावर गणवेश असतांना तसेच कार्यालयात सेवा बजावत असतांना पोलीस दलातील कार्यालयत तसेच कामकाजासाठी इतर शासकीय कार्यालयात वावरतांना स्वताजवळ तंबाखू, गुटखा, दारु, सिगारेट जवळ बाळगु नये तसेच कर्तव्यावर असतांता तंबाखू, गुटखा खाऊन कार्यालयाच्या भिंतीवर, बाथरुममध्ये, झाडांच्या कुंड्या व परिसरात थुंकतांना, सिगारेट ओढतांना किंवा वरील वस्तू सोबत बाळगतांना आढळून आल्यास संबंधित अधिकारी असो वा कर्मचारी यांच्यावर त्वरित शिस्तभंगाची कारवाई व ५०००/०० रुपये दंडाची शिक्षा करण्यात येईल तसेच कर्तव्यावर असतांना कोणीही दारु प्यालेला आढळल्यास त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा आदेश डॉ, राजकुमार शिंदे यांनी तडकाफडकी काढला आहे.
तसेच या आदेशाचे पत्र प्रत्येक पोलीस ठाण्यात पाठवण्यात आले असून पत्र मिळाल्यापासून दैनंदिन हजेरीच्या वेळी या पत्राचे सतत पाच दिवस वाचन करुन कार्यालयातील सर्व अधिकार व कर्मचाऱ्यांना अवगत करावे व या पत्राची एक प्रत ठाण्यातील नोटीस बोर्डावर तसेच व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये प्रसारीत करावी असे या आदेशात म्हटले आहे.