पाचोरा शहरासह तालुक्यात प्लॅस्टिक कोटेड पेपर कपचा बिनदिक्कत वापर नागरिकांचे आरोग्य धोक्यात.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/०१/२०२५
प्लॅस्टिक कोटेड पेपर कपचा बिनदिक्कत वापर केला जात असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून चहाचे शौकीन चहासोबतच आजारही गिळत असल्याचे मत वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले असून खरे तर चहा घेतांना ग्राहकांनीच काचेच्या ग्लासात किंवा कपबशी मध्ये चहा देण्यासाठी चहा विक्रेत्यांकडे आग्रह धरला पाहिजे असा स्पष्ट सल्लाही दिला आहे.
तसेच प्लॅस्टिक कोटेड ग्लास वापरण्यावर बंदी घातली असल्यावर सुध्दा हे प्लास्टिक कोटेड कपांची बाजारात खुलेआमपणे विक्री केली जात असून या कपांचा हॉटेल, लहानमोठ्या चहाच्या टपरीवर चहा देण्यासाठी सर्रास वापर होत आहे. तसेच हॉटेल किंवा चहाच्या टपरीवरुन दुसरीकडे ग्राहकांना चहा देवतांना कॅरी बॅगचा वापर केला जात असून या गैरप्रकारांना आळा घालण्याची जबाबदारी स्थानिक महानगरपालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायतीवर असल्यावर सुध्दा संबंधित प्रशासनाचे जबाबदार घटक याकडे कमालीचे दुर्लक्ष करत असल्याने पाचोरा शहरासह तालुक्यातील खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे हे प्लॅस्टिक कोटेड कप बनवतांना ज्या
घातक रसायनांचा वापर केला जातो त्या रसायनांमुळे मानवाला हानी पोहचते म्हणून शासनाने या प्लॅस्टिक कपावर बंदी घातली आहे तसेच तज्ञ डॉक्टर, आरोग्य संघटना व सरकारतर्फे नागरिकांना वारंवार सुचना व इशारा देत आहेत तरीही पाचोरा शहरासह खेड्यापाड्यातील हॉटेल्समध्ये व चहाच्या टपरीवर या कपांचा सर्रासपणे वापर केला जात असून पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्याधिकारी तसेच खेड्यापाड्यातील ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य हे जबाबदार लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याने या घातक प्लॅस्टिक कपांचा सर्रासपणे वापर होतांना दिसून येत आहे.
****************************************************
तज्ञ डॉक्टर, आरोग्य संघटना, सरकारतर्फे नागरिकांना सुचना.
****************************************************
घातक रसायनांचा वापर करुन हे चहा पिण्यासाठीचे प्लॅस्टिक कप बनवले जातात. चहा पितांना हे घातक रसायन व प्लास्टिकचे सुक्ष्म कण पोटात जमा होऊन या प्लॅस्टिक कणांमुळे व रसायनांमुळे पचनसंस्थेसह शरीरावर विपरीत परिणाम होऊन पोटाशी संबंधित समस्या सोबतच प्रजनन क्षमतेवर परिणाम तसेच कर्करोगासारखे आजार होऊन मानवी जीवनावर विपरीत परिणाम होऊ शकतात असा गंभीर इशारा दिला आहे.
म्हणून प्रत्येक चहा शौकीनांनी चहा, कॉफी घेतांना काचेच्या ग्लासात किंवा कपबशी शिवाय चहा घेणार नाही असा आग्रह हॉटेल व टपरीवरील चहा विक्रेत्यांकडे केला पाहिजे तसेच पाचोरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व जबाबदार घटक तसेच ग्रामीण भागातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी जातीने लक्ष घालून प्लॅस्टिक कप वापरणाऱ्या चहाच्या हॉटेल, टपरीवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे.
क्रमशः
पाचोरा शहरासह तालुक्यात मुबलक प्रमाणात कॅरी बॅग मिळत असल्याने सगळीकडे आनंदीआनंद.