भाऊंचे उद्यान येथे ई. डी. चौधरी लिखित “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२४
जळगाव येथील भाऊंचे उद्यान येथे सेवानिवृत्त माननीय प्राचार्य डॉ. श्री. एस. एस. राणे यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा ग्रंथालयांचे अधिकारी मा. श्री. सुहास रोकडे यांच्या शुभहस्ते श्री. ई. डी. चौधरी यांनी लिहिलेल्या “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला.
या “आहार हेच गुणकारी औषध” पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या सुरवातीला जळगाव इन्स्टिट्यूट फॉर रुरल डेव्हलपमेंट ॲंड सोशल सर्व्हिसेसचे अध्यक्ष डॉ. सुरेश शामराव पाटील, उपाध्यक्ष श्री. एम. एन. महाजन, संचालक श्री. संजीव पाटील या मान्यवरांच्या शुभहस्ते दिपप्रज्वलन करुन तसेच उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. तदनंतर जळगाव शहरातील सुप्रसिद्ध सर्जन डॉ. दीपक पाटील, पुस्तक लेखक मा. श्री. ई. डी. चौधरी साहेब,संस्था अध्यक्ष मा.डॉ. सुरेश पाटील ,ग्रंथालय अधिकारी मा.सुहास रोकडे साहेब,कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य श्री.एम.एस.राणे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी “आहार हेच गुणकारी औषध” या पुस्तकाचे लेखक श्री. ई. डी. चौधरी, पुण्यातील सुप्रसिद्ध चार्टर्ड अकांउटन सौ. सायली पाटील, श्री. सुर्यकांत पाटील, श्री. सुदाम पाटील, श्री. महेंद्र पाटील, श्री. अरुण हडपे, सौ. सरोज बडगुजर यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे विशेष शिक्षक श्री.राहुल पाटील तर संस्थेबद्दल माहिती व आभार प्रदर्शन उत्कर्ष मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.संजय बोरसे सर यांनी केले. या कार्यक्रमात भाऊंचे उद्यान येथे सकाळी मॉर्निंग वॉक साठी येणारी जेष्ठ मंडळी, संस्थाचालक, संस्थापक मंडळ उपस्थित होते.