कोल्हे येथील स्व. आर. एस. बाफना गोशाळेत आ. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गोपूजनाचा कार्यक्रम संपन्न.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२५/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील बाफना कृषी विद्या प्रसारक संस्था संचलित स्वर्गीय आर. एस. बाफना गोशाळेत दिनांक २४ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी सायंकाळी पाच वाजता माननीय आमदार श्री. किशोर आप्पा पाटील यांच्या हस्ते गोपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तदनंतर आमदार किशोर आप्पा पाटील यांनी हॅटट्रिक केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेशचंद्र बाफना यांनी गोशाळेतर्फे तसेच कोल्हे ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार व कोल्हे ग्रामस्थांनी आलेल्या मान्यवरांचा सत्कार केला. तसेच डॉक्टर बन्सीलाल जैन यांची गोसेवा संघाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा सत्कार केला.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रमेशचंद्र बाफना, जळगाव जिल्हा गोसेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मा. श्री. बन्सीलाल जैन, मानस सचिव श्री. राहुल बाफना कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. गणेश पाटील, पत्रकार श्री. प्रवीण भाऊ ब्राह्मणे, श्री सुनील पाटील, कृषी तंत्र विद्यालयाचे प्राचार्य श्री. फकिरचंद पाटील, श्री. विशाल पाटील, श्री. मनोहर चौधरी, माजी सरपंच श्री. भास्कर महाराज, श्री. शकुर भाऊ तडवी, पत्रकार श्री. सतीश गोपाळ, श्री. एकनाथ पाटील, नशाताई तडवी, बाफना कृषी तंत्र विद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी शिक्षकवृंद तसेच कोल्हे गावचे ग्रामस्थ बहुसंख्येने संख्येने उपस्थित होते.
या गोपूजन व सत्कार समारंभ प्रसंगी श्री. रमेशचंद्र बाफना यांनी आपल्या प्रास्ताविकात गोशाळेसाठी चारा शेड व कोल्हे गावासाठी स्मशानभूमी कडे जाणारा रस्ता बनवून द्यावा, कोल्हे गावाजवळ असलेल्या व मराठवाड्याला जोडणारा नांदोळ नदीवरील पूल उंच बांधुन द्यावा, कोल्हे येथे मागील बऱ्याच वर्षांपासून सुसज्ज असे आरोग्य केंद्र बांधण्यात आले आहे मात्र या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी नसल्याने ते धुळखात पडले आहे म्हणून या आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी देण्यात यावा, पानंद रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करावी, कोल्हे गावासठी सुसज्ज असा सभामंडप उभारण्यात यावा अशी विनंती केली.
कार्यक्रमाचे शेवटी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी त्यांचा भाषणात माननीय मुख्यमंत्री श्री. एकनाथराव व महायुती सरकारचे अभिनंदन करुन श्री. रमेशचंद्र बाफना यांनी गावासाठी मागणी केलेल्या कामांची लवकरच पुर्तता करण्याचे आश्वासन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. फकिरचंद पाटील यांनी तर आभार प्रदर्शन श्री. राहुल बाफना यांनी केले.