अंबे वडगाव येथील पी. सी. कॉटन जिनिंग मध्ये सी. सी. आय. कापूस खरेदी सुरू करा, शेतकऱ्यांची मागणी.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/१२/२०२४
सी. सी. आय’ च्या माध्यमातून देशात यंदा ५०० केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होणार आहे. महाराष्ट्र सध्या १२० केंद्रे सुरू करण्यात आली असून, या केंद्रांवर अपेक्षित दर्जाचा कापूस आल्यास खरेदी केली जाईल अशी माहिती, भारतीय कापूस महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक ललित कुमार गुप्ता यांनी ‘ॲग्रोवन’ला दिली होती अशी माहिती समोर आली आहे.
या सी. सी. आय. च्या माध्यमातून कापूस खरेदी करतांना ८ ते १२ टक्के ओलावा आणि लांब धागा (२९.५ ते ३०.५ मिमी) अशा दर्जाच्या कापसासाठी ७५२१ रुपयांचा दर निश्चित करण्यात आला असून धाग्याच्या लांबी नुसार (स्टेपल लेंथ) विचारात घेऊन
६६२१ ते एक्स्ट्रॉ लॉग स्टेपल (अधिक लांबीचा धागा) साठी ८७२१ रुपये असा हमी दर दिला जाणार आहे.
असे असले तरी आजच्या परिस्थितीत जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी सी. सी. आय. कापूस खरेदी सुरु करण्यात आली असून यात पाचोरा व जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील एका खासगी जिनिंगमध्ये सी. सी. आय. मार्फत कापूस खरेदी सुरु करण्यात आली असली तरी पाचोरा व जामनेर तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या व हाती आलेला कापूस विक्रीसाठी करण्यासाठी पाचोरा व जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील सी. सी. आय. केंद्रांवर एकच गर्दी उसळली असून याठिकाणी शेतकऱ्यांचे अतोनात हाल होत असून पंधरा, पंधरा दिवस वाहन भाडे भरुन उपाशीपोटी रहावे लागत आहे.
म्हणून पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पी. सी. के. कॉटन जिनपिंग मध्ये सी. सी. आय. कापूस खरेदी केंद्र सुरु करण्यात यावे अशी मागणी पाचोरा व जामनेर तालुक्यातील असंख्य कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.