पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी चोरीला गेलेली दुचाकी व दागिन्यासह चोरट्याला काही तासांतच केले जेरबंद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२३/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर गावात एका अज्ञात चोरट्याने दिनांक २१ डिसेंबर २०२४ शनिवार रात्री साडे दहा ते दिनांक २२ डिसेंबर २०२४ रविवार सकाळी साडे आठ वाजेच्या दरम्यान पिंपळगाव हरेश्वर येथील जैन गल्लीतील रहिवासी कापडाचे व्यावसायिक
प्रथम भुषण जैन यांच्या मालकीची घरासमोर लावलेली प्लेटीना कंपनीची दुचाकी तसेच पिंपळगाव हरेश्वर गावातील बाजार पट्ट्या जवळ असलेल्या सावली बाबांचा दर्गा या धर्मस्थळावरील साठ भार म्हणजे ६० ग्रॅम वजनाची चंद्रकोर आकाराची ४२,००० हजार रुपये किंमतीची चांदीची नाल चोरीला गेल्याची घटना घडली होती.
हि घटना घडल्यानंतर पिंपळगाव हरेश्वर येथील जैन गल्ली येथील रहिवासी प्रथम भूषण जैन वय वर्षे २३ या कापडाच्या व्यवसयीकाने त्यांच्या मालकीची एम. एच. १९, ए. एम. ९८७८ क्रमांकाची ग्रे रंगाची प्लेटीना कंपनीची पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेल्याची फिर्याद दाखल केली होती.
या फिर्यादीवरुन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तपासाची चक्रे फिरवून पन्नास हजार रुपये किंमतीची दुचाकी व बेचाळीस हजार रुपये किंमतीची सावली बाबांचा दर्गा वरील चंद्रकोर आकाराची चांदीची नाल चोरुन नेणाऱ्या पिंपळगाव हरेश्वर येथील आशिक उर्फ काल्या अजित तडवी वय वर्षे २४ याला दिनांक २२ डिसेंबर २०२४ रविवार रोजी दुपारी सव्वाचार वाजता चोरीला गेलेल्या ९२,००० हजार रुपयांच्या मुद्देमालासह काही तासांतच अटक केली असून आशिक तडवी उर्फ काल्या अजित तडवी याच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ३३६/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम ३०२(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील आरोपीला माननीय कोर्टात पोलीस कोठडी रिमांड कामी हजर केले असता मा. न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास पोलीस हवालदार शांतीलाल पगारे हे करीत आहेत.