शेताच्या बांधावरुन झालेल्या भांडणात महिलेला दमदाटी करत दिली जीवे मारण्याची धमकी पिंपळगाव पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव तांडा नंबर एक येथील रहिवासी ललिताबाई धर्मा चव्हाण वय वर्षे (५०) या दिनांक २१ डिसेंबर २०२४ शनिवार रोजी त्यांच्या मालकीच्या शेतात कामानिमित्त गेल्या असतांना त्याच्या शेताच्या बांधाला लागुन शेतजमीन असलेला शेतकरी एकनाथ कपूरचं चव्हाण वय वर्षे (५०) याने शेताच्या बांधावरुन कुरापत उकरुन काढत दिनांक २१ डिसेंबर २०२४ शनिवार रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ललिताबाई चव्हाण यांच्या शेतात जवळ जवळ जाऊन दमदाटी करुन तुला मारुन टाकीन अशी धमकी असल्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार दाखल केली आहे.
ललिताबाई चव्हाण यांच्या तक्रारीवरुन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला एकनाथ चव्हाण याच्या विरोधात प. ना. का. रजिस्टर नंबर ८०४/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ (बी. एन. एस.) चे कलम ३५२, ३५२(२), (३) प्रमाणे तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र नरवाडे हे करीत आहेत.