कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धेत चेतना हिरेला व्दितीय पारितोषिक.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२४
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथील शिक्षणमहर्षी कै. आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड यांच्या पुण्यतिथीनिमित्त धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को. ऑपरेटिव्ह सोसायटी व्दारा संचलित पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालयात दिनांक २० डिसेंबर २०२४ शुक्रवार रोजी आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत पाचोरा येथील नामांकित शिक्षणसंस्था श्री. शेठ मुरलीधर मानसिंगका कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. चेतना रणदीप हीरे हिने व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. यानिमित्ताने धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व वादविवाद स्पर्धा तसेच बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमांचे अध्यक्ष मा. आबासाहेब भिमराव शामराव शेळके यांच्या हस्ते कु. चेतना हीरे हिला पुष्पगुच्छ, सन्मानपत्र व रोख स्वरुपात बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
या घेण्यात आलेल्या वादविवाद स्पर्धा व बक्षीस वितरणाच्या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन मा. श्री. आबासाहेब भिमराव शामराव शेळके, प्रमुख पाहुणे म्हणून स्थानिक सल्लागार समितीचे अध्यक्ष कृषीभूषण मा. श्री. विश्वासराव पाटील, स्थानिक सल्लागार समितीचे सदस्य मा. श्री. उत्तमराव शेळके, डॉ. देवेंद्र शेळके सामाजिक कार्यकर्ते शिवराम भडके व आदी मान्यवर उपस्थित होते. या आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळवलेल्या कु. चेतना हीरे हिला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. मा. श्री. अतुल सुर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.