परभणी येथील संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड व अमित शहांच्या बेताल वक्तव्याचा पाचोरा येथे मोर्चा व्दारे जाहीर निषेध.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२४
परभणी येथे संविधानाच्या प्रतिमेची तोडफोड करणाऱ्या देशद्रोही इसमावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी काढण्यात आलेल्या मार्च्यात सामील असलेल्या बौद्ध बांधवांवर पोलीसांनी लाठीचार्ज करत अमानुषपणे मारझोड केली या मारझोडीत सोमनाथ सुर्यवंशी यांना आपले प्राण गमवावे लागले अशा शहीद झालेल्या सोमनाथ सुर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी तसेच आंदोलनकर्त्यांवर होत असलेले अत्याचार थांबवण्यासाठी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधून केलेल्या बेताल वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आज दिनांक २१ डिसेंबर २०२४ शनिवार रोजी सकाळी साडेअकरा वाजता पाचोरा शहरातील रेल्वे स्थानक रस्त्यावर असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत महात्मा जोतीराव फुले स्मारक, हुतात्मा स्मारक, श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाचोरा पोलीस स्टेशन पर्यंत निदर्शने करत सर्व पक्षीय निषेध मोर्चा काढण्यात आला व पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक पवार यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी किशोरजी डोंगरे, विकास पाटील सर, खंडू सोनवणे, अनिल लोंढे, ॲड. अविनाश भालेराव, खालील देशमुख, भालचंद्र ब्राम्हणे, अशोक मोरे, भरत खंडेलवाल, शरद पाटील, नंदकुमार सोनार, योगेश कदम, सुरज अहिरे, वाजीद बागवान, उमेश निकम यांच्यासह सर्व पक्षीय कार्यकर्ते व बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.