भडगाव दुय्यम निबंधक कार्यालयात बोगस दस्त नोंदणीची चौकशी करुन अनाधिकृत दलालांचा बंदोबस्त करावा.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२१/१२/२०२४
भडगाव तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयात मागील दोन वर्षांपासून घर किंवा प्लॉटची खरेदी, विक्री करतांना काही अनाधिकृत बोगस दलाला मार्फत ग्रामसेवक व तलाठी यांना हाताशी धरुन उताऱ्यावर बांधकाम केलेल्या ईमारती तसेच इतर बांधकाम केलेल्या घरांच्या ऐवजी त्या जागा बखळ असल्याचे दाखवून त्या बांधीव ईमारतीची खरेदी, विक्री केली जात असल्याने शासनाचा लाखो रुपये महसूल बुडत असल्याने जिल्हा निबंधक कार्यालयाकडून या गैरव्यवहाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी भडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय दोधू पाटील यांनी केली आहे.
तसेच भडगाव दुय्यम निबंधक कार्यालयातील दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांशी खरेदी, विक्रीचे व्यवहार करणाऱ्या दलालांचे साटेलोटे असल्याने मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करुन बोगस खरेदीखत केले जात असल्याचे निदर्शनास आले असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय दोधू पाटील यांनी केला असून या दुय्यम निबंधक कार्यालयात असलेल्या बोगस वेंडर व दलालांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करावा अशी मागणी केली असून पक्षकारांनी अधिकृत परवाना धारक वेंडर मार्फतच खरेदी, विक्रीचे दस्तऐवज तयार करुन खरेदी, विक्रीचे व्यवहार करावेत अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते विजय दोधू पाटील यांनी व्यक्त केली आहे.
तसेच भडगाव तहसील कार्यालयासमोरील न्यायालयाच्या भिंती कडील अनाधिकृत अतिक्रमण काढून त्या जागेवर वाहनतळ तयार करण्यात यावे म्हणजे कार्यालयीन कामकाजासाठी येणाऱ्या लोकांना या ठिकाणी आटली वासने उभी करता येतील तसेच विनापरवानगी खरेदी, विक्रीचे व्यवहार करणाऱ्या बोगस झलालांचा बंदोबस्त करावा म्हणजे खोटे दस्तऐवज तयार करुन होणाऱ्या खरेदी, विक्रीच्या व्यवहारात बुडणारा शासनाचा महसूल बुडणार नाही अशी मागणी एका निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते विजय दोधू पाटील यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी व सहनिबंधक यांच्याकडे केली आहे.