कै. आप्पासाहेब मोरेश्वर देशपांडे यांच्या मृत्यूपत्रानुसार सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांना लाखोंची देणगी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/१२/२०२४
पिंपळगाव हरेश्वर येथील कै. आप्पासाहेब मोरेश्वर देशपांडे यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या पिंपळगाव हरेश्वर येथील स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून येणारी रक्कम समाजोपयोगी पडावी म्हणून त्यांनी हयातीतच मृत्यूपत्रात तसे नमूद करुन ठेवले होते. या मृत्यूपत्रानुसार त्यांच्या स्थावर मालमत्ता विक्रीतून येणारी रक्कम ही सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना देणगी रुपाने देण्याचे समुद केलेले होते.
या मृत्यूपत्रानुसार आज दिनांक २० डिसेंबर २०२४ शुक्रवार रोजी एका छोटेखानी कार्यक्रमात त्यांचे उत्तराधिकारी मा. श्री. विजय शंकर देशपांडे व मा. श्री. नितीन रंगनाथ देव यांनी त्यांच्या हस्ते धनादेश वितरण केले. यात कै. मोरेश्वर देशपांडे यांनी मृत्यूपत्रात लिहून ठेवल्या प्रमाणे पिंपळगाव हरेश्वर येथील श्री. स्वामी समर्थ केंद्राला ३,००,००० रुपये, माजी विद्यार्थी संघ संचलित मूकबधिर निवासी विद्यालयाला २,००,००० रुपये, नगरदेवळा येथील श्री. विश्वासराव पवार शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थेला १,००,००० रुपये, ग्रामविकास मंडळ पिंपळगाव हरेश्वर या शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता ८ वी, ९ वी, १० वी व १२ वी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेकरीता १,००,००० रुपये तसेच श्री. प्रमोद वामन सपकाळ, श्री. सागर विजय देशपांडे, श्री. अमोल अनिल पाटील, मनोज पाटील, श्री. मनोज मोहन पांडेंजी यांना प्रत्येकी २०,००० हजार रुपये देणगी दिली. यासोबतच महाराष्ट्रातील विविध संस्थांना लाखोंची देणगी दिलेली आहे.
कै. मोरेश्वर देशपांडे यांच्या मृत्यूपत्रानुसार देणगी देण्यासाठी आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात श्री. पी. एस. पाटील, श्री. राजेंद्र विश्वनाथ महाजन, श्री. पी. बी. पाटील, श्री. नितीन रंगनाथ देव व श्री. अभिजित पाटील यांनी कै. आप्पासाहेब मोरेश्वर देशपांडे यांच्या जीवनावर व त्यांनी केलेल्या समाजकार्याला व त्यांनी केलेल्या सेवाभावी उपक्रमांना उजाळा देत जुन्या आठवणी ताज्या केल्या व विनम्र अभिवादन केले. यावेळी उपस्थितांचे डोळे पाणावले होते.
या निधी वितरणाच्या छोटेखानी कार्यक्रमात श्री. सुरेश बापू बडगुजर, श्री. भास्कर धनजी पाटील, श्री. सुखदेव विठ्ठल गिते, श्री. प्रमोद मधुकरराव गरुड, श्री. जनार्दन ओंकार देव, श्री. देवेंद्र भिला देव, श्री. श्रीराम माधव चौधरी, श्री. राजेंद्र आनंदराव सपकाळ, श्री. मोहन जगन्नाथ पांडेजी, मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. ईश्वर पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुकबधीर विद्यालयाचे उपशिक्षक श्री. गोविंद महाजन यांनी केले. कार्यक्रमाचे शेवटी कै. आप्पासाहेब मोरेश्वर देशपांडे यांची पुण्यतिथी दरवर्षी साजरी करण्यात यावी असा मनोदय उपस्थितांनी बोलून दाखवला व सर्वानूमते दरवर्षी पुण्यतिथी साजरी करण्याचे ठरवण्यात आले.