२४ डिसेंबर रोजी अंबे वडगाव येथील महानुभाव आश्रमाचा वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/१२/२०२४
अनंत ब्रम्हांडनायक साधनदाता सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामींच्या असीम कृपाशीर्वादाने व कैवल्यवासी आचार्य प.पू.प.म.१०८ श्रीअशनाख्य (भोजने) बाबा, कैवल्यवासी परम पुज्य परम महंत श्री. महाराष्ट्राधिकरण गुरुवर्य आचार्रप्रवर श्री. मोठे बाबाजी तसेच कैवल्यवासी आचार्य परम पूज्य परम महंत १०८ श्री. दत्तराज बाबाजी तळेगावकर यांच्या प्रसन्न मनोधैर्याने प्रतिवर्षाप्रमाणे पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथील पारिमांडल्य महानुभाव आश्रमाच्या वर्धापनदिनानिमित्त २४ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले असून या वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
यात दिनांक २३ डिसेंबर २०२४ सोमवार रोजी दुपारी ०४ वाजता शोभायात्रा, रात्री ०८ वाजता किर्तन, दिनांक २४ डिसेंबर २०२४ मंगळवार रोजी सकाळी ०५ वाजता मंगल अभिषेक, ०६ वाजता श्रीमदभगवतगीतापाठ, ०८ वाजता ध्वजारोहण, सभामंडपाचे उद्घाटन, ०९ वाजता धर्मसभा, १० वाजता प्रास्ताविक, ११ वाजता संन्यास दिक्षा, दुपारी १२ वाजता श्रीपंचावतार उपहार सोहळा, आरती, साडे बारा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या वर्धापनदिनानिमित्त पंथातील धर्माधार स्तंभ असलेले विद्वरत्न प्रतिभासंपन्न प्रमुख आचार्यगण संत, महंत, भिक्षूक मंडळींची उपस्थिती लाभणार असल्याने या अभुतपूर्व महामंगल सोहळ्यात सर्व भाविक, भक्त व वासनिकांनी सहपरिवार उपस्थित राहून चतुर्विध साधनांचा लाभ घ्यावा असे आवाहन ज्ञानरत्न परम पुज्य मिराताईजी (आत्या) शेवलीकर (सारोळा) यांच्या सानिध्यात असलेल्या धर्म कुमारी राजश्री यळमकर, युक्ती गोपालराव (अंबे वडगाव), ज्ञानरत्न परम पूज्य महंत श्री. बालकृष्ण दादाजी मराठे यांच्या सान्निध्यात असलेले धर्म कुमार गौरव येळमकर (अंबे वडगाव) तसेच पारिमांडल्य महानुभव आश्रम तथा स्वागतोत्सुक परम पूज्य महंत श्री. येळमकर बाबा महानुभाव, येळमकर प्रतिष्ठेच्या सर्व शिष्य गाद्या, परम पूज्य इंदू आक्का तळेगावकर व समस्त उपदेशी मंडळी अंबे वडगाव यांनी केले आहे.