वरखेडी येथील एकाच कुटुंबातील तीन भाऊ व एक बहिण सैन्यदलात भरती.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१४/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील एकाच कुटुंबातील तीन भाऊ व एक बहिणीची सैन्यदलात निवड झाली असून हे चौघे भावंडं आता देशसेवेसाठी जाणार असल्याने या परिवाराचे सर्वत्र कौतुक केले जात असून निवड झालेल्या भावा, बहिणींवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील शेतकरी कुटुंबातील तेली समाजाचे श्री. ज्ञानेश्वर पांडुरंग चौधरी यांची तीन मुले रोहित चौधरी यांची (आसाम रायफल), योगेश चौधरी यांची (इंडियन नेव्ही, एस. एस, आर), आशिष चौधरी यांची (इंडियन नेव्ही, एस. एस. आर) व कुमारी पल्लवी चौधरी यांची (आय. टी. बी. पी.) या पदावर सैन्यदलात निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांच्याशी संवाद साधला असता आमचे वडील शेती व्यवसाय करतात परंतु त्यांनी आम्हाला शिकवण्यासाठी काबाडकष्ट केले व आम्हाला चांगल्याप्रकारे शिक्षणासोबतच संस्कार देत असतांन त्यांनी आम्हाला आपण या देशाचे व समाजाचे काही देणे लागतो म्हणून तुम्ही देशासाठी व समाजासाठी काहीतरी केले पाहिजे नाहीतर फक्त शिक्षण व पदव्या हातात घेऊन मिरवण्यात काही अर्थ असे सांगायचे व आम्हीसुद्धा वडिलांच्या व आईच्या इच्छेनुसार वागलो व आज आईवडिलांचे स्वप्न आम्ही पूर्ण केले.