अंबे वडगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळले, साफसफाई व धुर फवारणची गरज.

Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१२/१२/२०२४
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव येथे डेंग्यूचे रुग्ण आढळले असून या डेंग्यूच्या रुग्णांवर पाचोरा येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरु असून गावात अजुन बऱ्याचशा लोकांना उच्च ताप, डोकेदुखी, मळमळ, उलट्या होणे, डोळ्यांच्या मागे वेदना, अंगावर पुरळ व डोळ्यांच्या मागे वेदना होणे ही लक्षणे जाणवत आहेत. अंबे वडगाव गावात डेंग्यूचे रुग्ण आढळले असल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे सावट पसरले असून गावातील सांडपाण्याच्या गटारी तसेच घराघरात पाणी साठवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या टाक्यांची स्वच्छता व त्या झाकण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच जंतुनाशक औषधांची व धुळ फवारणी करावी अशी मागणी अंबे वडगाव येथील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.