जळगाव महापालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांची पत्रकाराशी अरेरावी, जळगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~११/१२/२०२४
विधानसभा निवडणुका झाल्यापासून महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली आहे. परंतु निवडणूक झाल्यापासून आजपर्यंत मंत्रीपद व महत्वाचे खाते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सर्वच आमदार प्रयत्नशील असून या मंत्री व महत्वाचे खाते पदरात पाडून घेण्याच्या नादात अजुनही सरकार स्थापन झालेले नसल्याने महाराष्ट्रातील राज्य कारभाराकडे कमालीचे दुर्लक्ष झाले असल्याने सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनमानी कारभार सुरु केला असून जो, तो आपल्या ताटात तुप ओढून घेत आहे.
याचेच जिवंत उदाहरण म्हणजे जळगाव शहरासह जिल्ह्यात व महाराष्ट्रातील बऱ्याचशा कार्यालयात मागील पंधरवड्यात लाच घेतांना काही अधिकारी व कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले आहेत. तरीही बऱ्याचशा कार्यालयात अजूनही अधिकारी व कर्मचारी मनमानी कारभार करत आहेत. व दिल्या, घेतल्या शिवाय सर्वसामान्य माणसाची कामे होत नाहीत.
या मनमानी कारभाराबाबत आवाज उठवण्यासाठी प्रसारमाध्यमे प्रयत्नशील असतात. परंतु मस्तावले अधिकारी व कर्मचारी पत्रकारांना जुमानत नाहीत. बरेचसे अधिकारी व कर्मचारी कार्यालयीन वेळेत जागेवर सापडत नाहीत मग प्रसारमाध्यमे वृत्तांकन करण्यासाठी शासकीय कार्यालयात जाऊन सत्य परिस्थिती दाखवण्यासाठी छायाचित्रण करतात तेव्हा मग अशा मनमानी कारभार करणारे भ्रष्ट अधिकारी व कर्मचारी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना जाणून, बुजून बदनाम करण्याचा प्रयत्न करत असतात.
असाच काहीसा प्रकार जळगाव महानगरपालिकेत घडला असून या घटनेत पत्रकार विक्रम कापडणे हे जळगाव महानगरपालिकेच्या लेखा विभागाच्या बाहेरील कक्षात छायाचित्रण करत असतांनाच महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांनी लेखा विभागाच्या बाहेरील कक्षात येऊन भांडारपाल व कार्यालयातील कर्मचाऱ्यांसमोर पत्रकार विक्रम कापडणे हे छायाचित्रण करत असताना त्यांच्या हातातील कॅमेरा जबरदस्तीने हिसकावून घेत एका कर्मचाऱ्याजवळ दिला व नंतर कॅमेरा मध्ये असलेले मेमरी कार्ड काढून घेतल्याची घटना घडली आहे.
ही घटना घडल्यानंतर पत्रकार विक्रम कापडणे यांनी लगेचच बाहेर येऊन जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये तातडीने धाव घेतली व महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्या विरोधात कॅमेरा हिसकावून घेणे, कॅमेऱ्यातील मेमरी कार्ड काढून घेणे, दमदाटी करत अंगावर धावून जाणे याबाबत गुन्हा रजिस्टर क्रमांक ७२३/२०२४ कायदेशीर कलम ११५ (२) अंतर्गत रितसर गुन्हा दाखल केला आहे.
असे असले तरी गुन्हा दाखल झाल्यानंतर संबंधित अधिकारी घटनेचा तपास करत असून सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांची भुमिका जाणून घेणे महत्वाचे असल्याने त्यांचा प्रतिवाद काय आहे हे अद्यापही स्पष्ट झाले नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला असून
या घटनेबाबत पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून जळगाव शहरासह जळगाव जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांकडून या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी व सार्वजनिक हितासाठी कोणत्याही शासकीय कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी पत्रकारांना छायाचित्रण करण्याची मुभा असल्याचे कायदेशीर अधिकार असल्याचे मा. न्यायालयाने याअगोदर जाहीर केले आहे. परंतु तरीही काही शासकीय अधिकारी व कर्मचारी त्यांच्या पदाचा गैरवापर करुन दबावाखाली घेऊन आपला नाकर्तेपणा व पाप झाकण्यासाठी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना छायाचित्रण करण्यापासून रोखत असतील तर ते मा. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध असल्याने कायद्याचा भंग मानला जातो.
यामुळे जळगाव शहरासह जिल्ह्यातील सर्व पत्रकारांनी या घटनेचा निषेध नोंदवला असून महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली असून सामाजिक कार्यकर्ते दिपक कुमार गुप्ता यांना माहिती मिळताच त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना भेटून शासकीय कार्यालयात छायाचित्रण करण्याची मनाई आहे असे काही आपणाकडे जजमेंट आहे का ? असा प्रश्न उपस्थित केला तेव्हा संबंधित अधिकारी हे निरुत्तर झाले होते. तसेच संबंधित शेतकऱ्यांना कितपत कायद्याचे ज्ञान आहे हे लक्षात येते.