देना आया तो रोना आया, लाडक्या लाभार्थी बहिणींची फेरतपासणी सुरु.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०४/१२/२०२४
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारने जनहितार्थ अनेक योजना अंमलात आणल्या व त्या प्रत्यक्षात कृतीत आणून जनतेच्या मनात वेगळेच स्थान निर्माण केले व याचाच फायदा होऊन सन २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने सर्वदूर बहुमताने एक हाती सत्ता काबीज केली मात्र विधानसभा निवडणुकीच्या यश प्राप्तीनंतर महायुतीने आपला रंग दाखवायला सुरुवात केली असून यात महायुतीचा खोटारडेपणा उघड होत असल्या अनुभव महाराष्ट्रातील जनतेला येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या यश प्राप्तीनंतर महायुतीने सगळ्यात पहिला झटका मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींना दिला असून या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील लाभार्थी असलेल्या लाडक्या बहिणींची फेरतपासणी करण्यासाठी प्रक्रिया सुरु करण्याची तयारी सुरु केली आहे. या फेरतपासणी योजनेच्या माध्यमातून महायुती सरकारने थोडक्यात सांगायचे झाले तर महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जाहीर केलेल्या लाडकी बहिण योजनेतील अर्जदार लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत की नाही, ही लाकडी बहिणी योजना योग्य व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचते आहे की नाही याकरिता फेरतपासणी करण्यासाठी तयारी सुरु केली असल्याची माहिती समोर येत असून या योजनेत नव्याने सहा बदल करण्यात आले असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर येत आहे.
या नवीन फेरतपासणीमुळे लाडक्या बहिणींमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याची परिस्थिती दिसून येत असून कदाचित मतदान मिळवून घेण्यासाठी केलेला हा खटाटोप होता व आता ‘देना आया तो रोना आया’ अशी खोचक टीका केली जात आहे.