पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळाचा कारभार म्हणजे, आंधळ दळतंय आणि ** पीठ खातय.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०३/१२/२०२४
पिंपळगाव हरेश्वर या पवित्र नगरीत काही हुकुमशहा बसलेले असून असाच एक हुकुमशहा पिंपळगाव हरेश्वर येथील ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षांच्या खुर्चीवर भुजंगासन करुन बसले असून ते कुणालाही विश्वासात न घेता व कायद्याचा कोणताही धाक न बाळगता कायदा खिशात ठेवून मनमानी कारभार करत असल्याच्या तक्रारी मागील काही वर्षांपासून ऐकावयास मिळत आहेत.
अशा या वादग्रस्त अध्यक्षांनी दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रविवार म्हणजे (सुटीच्या दिवशी) ग्रामविकास मंडळाची वार्षिक सभा घेऊन सभेमध्ये गोंधळ सुरु असतांनाच या गोंधळाचा फायदा घेत सभेचे विषय वाचून घेत आयत्यावेळी आलेल्या विषयांकडे व तक्रारींकडे हेतूपरस्कर दुर्लक्ष करत वार्षिक सभा संपल्याचे जाहीर केल्यामुळे या वार्षिक सभेत उपस्थित असलेले सभासद व इतर सुज्ञ नागरिकांना ग्रामविकास मंडळाबद्दल झालेल्या व सुरु असलेल्या कामकाजाची माहिती दिली नाही तसेच या वार्षिक सभेत काही सदस्यांनी व सुज्ञ नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे न देताच हुकुमशाही करत वार्षिक सभा गुंडाळून घेतली असल्याचे खात्रीलायक वृत्त असून या अध्यक्षांच्या मनमानी कारभाराबाबत पिंपळगाव हरेश्वर ग्रामविकास मंडळाचे सभासद व गावातील जनतेतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेच ग्रामविकास मंडळाच्या काही सभासदांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना भेटून काही विशेष माहिती दिली असून यात ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. याबाबत बोलतांना सुज्ञ सभासदांच्या मते ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष हे स्वताला आजही इन्कमटॅक्स कमीशनर समजून घेणारे तसेच स्वताहून चुकीची कामे करुन त्यावर पांघरुण घालून खोटेनाटे काम करणाऱ्यांपैकी हे पहिले अध्यक्ष असल्याचे मत व्यक्त केले.
याबाबत पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षांनी स्वताच्या चुलत भावाच्या पत्नीचे न्यायालयीन कामकाजासाठी तसेच शालार्थ आय. डी. व व्यक्तीगत मान्यता आणण्यासाठी ग्रामविकास मंडळाच्या खजिन्यातून पैसे खर्च केले असून हे साफ चुकीचे असल्याचे सांगत सदरील शिक्षीका ह्यांनी सन २०२१ पर्यंत खाजगी प्राथमिक विद्यामंदिर पिंपळगाव हरेश्वर मंडळाकडून मानधन स्विकारलेले असल्यावरही महाशयांनी सदर शिक्षिकेचे सन २०१७ पासून शिक्षण समितीचा ठराव करुन घेत व्यक्तीगत मान्यता आणली असल्याच्या आरोप केला आहे.
तसेच शासनाची कुठल्याही प्रकारची परवानगी नसतांना व मागासवर्गीय अनुशेष शिल्लक असतांनाही या शिल्लक अनुशेष कडे दुर्लक्ष करत सदरील शिक्षीका ह्या नातेवाईक असल्याने स्वताहून थेट न्यायालयातून परवानगी आणून व्यक्तीशा मान्यता घेऊन शालार्थ आय. डी. काढून दिला असल्याचे सांगितले व याच गैरप्रकाराबाबत ०१ डिसेंबर २०२४ रविवार रोजी घेण्यात आलेल्या वार्षिक सभेत हा प्रश्न विचारला जाण्याची शक्यता असल्याने त्यांनी हुकुमशाही पध्दतीने वार्षिक सभा आटोपती घेत सभासदांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत असे सांगितले तसेच हे हुकुमशाही पध्दतीने कामकाज करत खऱ्याचे खोटे व खोट्याचे खरे करत आहेत. तसेच मूकबधिर संस्थेत हे महाशय ज्याप्रकारे हुकुमशाही पध्दतीने काम करत आहेत तशाच हुकुमशाही वृत्तीचा अनुभव या वार्षिक सभेत पहायला मिळला असा गंभीर आरोप करण्यात येत आहे.
हा प्रकार येथेच थांबत नसून या अध्यक्षांच्या बाबतीत अनेक खुलासे समोर येत आहेत. यात गंभीर बाब म्हणजे दिनांक ०१ डिसेंबर २०२४ रविवार रोजी वार्षिक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सभेमध्ये आपल्या विरोधात कुणीही आवाज उठवू नये म्हणून सभासदांची मर्जी संपादन करण्यासाठी अध्यक्षांनी सभासदांना वार्षिक सभेमध्ये आणण्यासाठी ग्रामविकास मंडळाच्या खजिन्यातून पैसा खर्च करुन स्वतंत्र वाहनाची व्यवस्था केली तसेच अध्यक्ष साहेब येथेच थांबले नाहीत तर त्यांनी त्यांना दारु पाजून थोडक्यात सांगायचे झाले तर ओली पार्टी देऊन खुष केल्याचा आरोप एका सभासदाने कथन केला असून आजपर्यंत एकही अध्यक्षांनी असा प्रताप केला नसल्याचे बोलले जात आहे.
सभासदांना वार्षिक सभेमध्ये या असे घराघरात जाऊन सांगून तसेच ओल्या पार्ट्या देऊन स्वतंत्रपणे वाहनाची व्यवस्था करुन वार्षिक सभेमध्ये आणण्याची गरज या अध्यक्षांना का भासली याबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली असता संबंधित अध्यक्षांनी या शैक्षणिक संस्थेमध्ये मनमानी कारभार करत बरेचसे काळे, गोरे व कायदा धाब्यावर बसवून इतर काही कामे केली आहेत. त्यांवर पांघरुण घालण्यासाठी या अध्यक्षांनी सभासदांच्या दारात जाऊन एकप्रकारे त्यांच्यासाठी पायघड्या घातल्या व वार्षिक सभेसाठी कधी नव्हे इतक्या मोठ्या प्रमाणात खर्च करुन संचालकांना एक प्रकारे आमिष देऊन आपला हेतू साध्य करुन घेतला असल्याचा आरोप सुज्ञ सभासदांनी केला असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
*****************************************************
ग्रामविकास मंडळाचा लेखाजोखा पाहाण्याची परवानगी न दिल्यास लवकरच पत्रकार परिषद घेणार, किशोर गरुड.
******************************************************
ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष हे सद्यस्थितीत मनमानी कारभार करत असून नुकत्याच घेण्यात आलेल्या वार्षिक सभेमध्ये अध्यक्षांनी वारेमाप खर्च करुन स्वताच्या काळ्या कारनाम्यांवर पांघरुण घातले आहे. हा सगळा सावळागोंधळ व कारभार पाहून मी ग्रामविकास मंडळाच्या सर्व कामकाजात झालेल्या गैरप्रकारांची चौकशी व्हावी म्हणून सर्व विभागातील झालेल्या कामकाजाच्या तपासणी होण्यासाठी अर्ज केला होता. मात्र पराक्रमी हुकुमशहा अध्यक्षांनी मला हव्या असलेल्या विभागातील दप्तर व लेखाजोखा तपासणीसाठी परवानगी दिलेली नाही. यावरुन या अध्यक्षांनी मोठ्या प्रमाणात गैरकारभार केला असल्याचा संशय किशोर गरुड यांनी व्यक्त केला आहे.
विशेष म्हणजे संस्थेच्या कामकाज करतांना अध्यक्ष महाशय हे संचालक मंडळातील एकाही संचालकांना विश्वासात घेऊन संचालक व सभासदांना न विचारताच मनमानी कारभार करतात हा कारभार करतांना स्वहित तसेच नातेवाईक व आप्तेष्टांच्या हितासाठी सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करतात व हे करण्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात चुकीची कामे करुन घेतली आहेत व आजही करत आहेत यांच्या मनमानी कारभाराबाबत भरपूर काही उघडकीस आणण्यासाठी भरपूर प्रकरणे आहेत मात्र शैक्षणिक क्षेत्राला गालबोट लागून संस्थेचे नुकसान होऊ नये म्हणून मी काही गोष्टी आज जाहीर करु शकत नाही असे मत किशोर गरुड यांनी व्यक्त केले.
***************************************************
किशोर गरुड यांचा गंभीर इशारा.
****************************************************
मात्र ग्रामविकास मंडळाच्या अध्यक्षांनी येत्या आठ दिवसात मला ग्रामविकास मंडळाचा लेखाजोखा दाखवून तसेच आजपर्यंत केलेल्या व झालेल्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती न दिल्यास मी लवकरच पत्रकार परिषद घेऊन या अध्यक्षांच्या सर्व कारनाम्याचा भांडाफोड करणार असून पुढील कारवाईसाठी समाजकल्याण विभागाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले तसेच जर या अध्यक्ष महाशयांचे कामकाज स्वच्छ असते तर त्यांनी वार्षिक सभेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली असती परंतु कामकाजात मोठ्या प्रमाणात गैरकारभार व सावळागोंधळ सुरु असल्याने त्यांनी नावालाच वार्षिक सभा घेण्याचा दिखावा केला गोंधळाचा फायदा घेत वार्षिक सभा आटोपती घेत आपल्या काळ्या कारनाम्यांवर पांघरुण घातले आहे असे मत व्यक्त केले.
टीप ~ मागील काही महिन्यांपूर्वी एका शिक्षकाने एका विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य केले होते तेव्हाही या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांच्या पालकाला दबावाखाली घेऊन प्रकरण दाबले आहे. तेव्हापासून संबंधित शिक्षक काही दिवस शाळेत हजर नव्हता परंतु अजून हा विकृत शिक्षक शाळेत हजर झाल्याची माहिती समोर येत असून या विकृत शिक्षकामुळेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.