पाचोरा शेतकी संघात नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीचा माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांच्या हस्ते शुभारंभ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२४
पाचोरा येथील शेतकी संघात आजपासून नाफेड मार्फत सोयाबीन खरेदीला आज सुरुवात करण्यात आली. या सोयाबीन खरेदीचा शुभारंभ माजी आमदार मा. श्री. दिलीप भाऊ वाघ यांच्याहस्ते श्रीफळ वाढवून व काटा पूजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसाहेब मा. श्री. गणेश पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
या शुभप्रसंगी सोयाबीन विक्री करण्यासाठी आलेले शेतकरी मा. श्री. मंगलदास कुमावत यांचा सत्कार करुन सोयाबीन खरेदीला सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्हाईस बालाजी गृपचे संचालक मा. श्री. नंदू पाटील, संचालक श्री. प्रकाश निकम, श्री. सुनील पाटील, श्री. अनिल पाटील, श्री. शिवदास पाटील, श्री. प्रवीण गुजर, श्री. राजेंद्र आबा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री. बोरुडे, नाफेडचे श्री. सी. एन. चव्हाण, शेतकी संघाचे मॅनेजर श्री. प्रभाकर भावसार, संघाचे कर्मचारी श्री. कैलास सुर्यवंशी, श्री. संतोष पाटील, श्री. ईश्वर पाटील, माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांचे सहाय्यक श्री. गोपी पाटील व राज जगताप व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.