जळगाव जिल्हा गोशाळा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. बन्सीलाल दुगड तर सचिवपदी दिपक पाटील.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०२/१२/२०२४
जळगाव येथील श्री. रतनलाल सी. बाफना गोसेवा अनुसंधान केंद्र कुसुंबा येथे जळगाव जिल्ह्यातील गोशाळा महासंघाचे संचालक, ट्रस्टी, गोप्रमी, कार्यकर्ते यांची एक मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगमध्ये जळगाव जिल्हा गोशाळा महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी डॉ. बन्सीलाल दुगड तर सचिवपदी दिपक पाटील यांची सर्वानुमते नुकतीच निवड करण्यात आली यावेळी आदिजीन युवक चॅरिटेबल ट्रस्ट मुंबईचे श्री. जयेश भाई शाह, निलेश भाई शाह, महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. उद्धवजी नेरकर, पाचोरा तालुक्यातील कोल्हे येथील गोशाळेचे चेअरमन रमेशचंद्रजी बाफना, वरखेडी येथील कापड दुकानाचे प्रसिद्ध व्यापारी व महावीर गोशाळेचे चेअरमन मा. श्री. विजयजी बडोला, आर. सी. बाफना गोशाळेचे संचालक, अकोला, वाशीम येथील ५० कार्यकर्ते व गोपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.