मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, महाराष्ट्रात ४८ तासात पाऊस हजेरी लावणार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~०१/१२/२०२४
माणसातील आणि राजकारणातील काही होणाऱ्या बदलांची लागण निसर्गाला झाली असावी असा अंदाज आहे कारण निसर्गातही कमालीचा बदल होतांना दिसून येत असून यात पावसाळ्यात उन्हाळा, उन्हाळ्यात पावसाळा तर कधी हिवाळ्यात वादळ असा कमालीचा बदल झाला आहे. पंजाबराव डख यांनी आता नुकताच हवामानाचा अंदाज व्यक्त केला असून येत्या ४८ तासात राज्यातील काही जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी करण्यात आला असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला असल्याने या कमी दाबाचा पट्ट्यामुळे फेंगल चक्रीवादळ तयार झाले असून या चक्रीवादळाचा आपल्या महाराष्ट्रावर नेमका काय परिणाम होणार आहे ही माहिती समोर आली असून यात राज्यात येत्या ४८ तासानंतर पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. अर्थातच भारतीय हवामान खात्याने ३ डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दिवशी राज्यातील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पाऊस पडण्याचा अंदाज आहे. खरंतर भारतीय हवामान खात्याने आधी या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रावर कोणताच परिणाम होणार नाही, असे म्हटले होते. पण आता याचा प्रभाव महाराष्ट्रावर पाहायला मिळू शकतो असा अंदाज हवामान विभागाने नुकताच वर्तविला आहे.
या अंदाजानुसार महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्र विभागातील आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांवर पाहायला मिळू शकतो असा अंदाज आय. एम. डी. ने जारी केला असून आय. एम. डी. तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे येत्या २४ तासात हे चक्रीवादळ आणखी तीव्र होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असून येत्या ६ डिसेंबरला मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
आता आपण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांमध्ये वादळाच्या प्रभावामुळे पाऊस पडणार या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. भारतीय हवामान विभाग राज्यात येत्या ४८ तासानंतर पावसाला सुरुवात होणार असा अंदाज आहे. अर्थातच भारतीय हवामान खात्याने ३ डिसेंबरला महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. या दिवशी राज्यातील दक्षिण कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे.
तसेच जिल्हा निहाय बोलायचं झालं तर या दिवशी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव परिसरात मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. याशिवाय दक्षिण भारतात वादळी वारे, गारा आणि अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. राज्यातील बहुतांश भागात उद्या ढगाळ हवामान तयार होऊ शकते, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. फक्त भारतीय हवामान खात्यानेच नाही तर पंजाबराव डख यांनी देखील राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.
यात पंजाबराव डख यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात येत्या २ डिसेंबर ते ८ डिसेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे. २ डिसेंबर ते ४ डिसेंबर दरम्यान राज्यात किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडणार, मात्र ४ डिसेंबर ते आठ डिसेंबर दरम्यान राज्यातील पावसाची व्याप्ती वाढेल असे पंजाबराव डंख यांनी म्हटले आहे.