अंबे वडगाव येथे उद्या घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत अवैध धंद्याचा विषय वादळी ठरणार.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२४
पाचोरा तालुक्यातील अंबे वडगाव गावात गावठी दारु, देशी दारुची खुलेआम विक्री केली जात आहे. तसेच विशेष म्हणजे मान्यताप्राप्त बिअर, बार व हॉटेलमध्ये नियमबाह्य देशी व गावठी दारुची विक्री केली जात असून गावात दोन ठिकाणी सट्टा पेढ्या सुरु आहेत. यामुळे गावातील वातावरण दुषित झाले असून व्यसनाधीन लोक आपल्या व्यसनपूर्ती करीता घरातील धान्य तसेच स्वस्त धान्य दुकानातून मिळणारे गहू, तांदूळ तसेच माता भगिनींना मिळणारे लाकडी बहिणी योजनेचे पैसे हिसकावून घेत या व्यसनाच्या नादात उधळपट्टी करत असल्याने घराघरात दररोज भांडणतंटे होत आहेत.
वरील प्रकारचे सर्व अवैध धंदे दिवसाढवळ्या, रात्रंदिवस, बिनबोभाटपणे सुरु असल्याने अल्पवयीन मुलांसह तरुण वर्ग व म्हातारे अर्क या व्यसनाच्या आहारी जाऊन स्वताचे आर्थिक व शारीरिक नुकसान करुन घेत आहेत. यात महत्त्वाची बाब म्हणजे हे अवैध धंदे धर्मस्थळाजवळ, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून थोड्याच अंतरावर बसस्थानक परिसरात तसेच भरवस्तीत दिवसाढवळ्या, रात्रंदिवस, बिनबोभाटपणे सुरु असल्याने गावातील शांतता भंग झाली आहे.
************************************************
अवैध धंदे करणारे व पोलीस खेळतात खो, खो चा खेळ.
*************************************************
अंबे वडगाव गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी गावातील सुज्ञ नागरिक व महिलावर्ग यांच्याकडून आलेल्या तोंडी तक्रारींची दखल घेऊन अवैध धंदे बंद करण्यासाठी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवण्यात आला मात्र दारुबंदी अधिकाऱ्यांनी आजपर्यंत एकही कारवाई केली नसून पिंपळगाव हरेश्वर पोलीसांनी जमेल तेव्हा कारवाई करण्यासाठी धाडसत्र राबवून वेळोवेळी कारवाया केल्या आहेत. मात्र एका बाजूला कारवाई केली जाते तर दुसरीकडे लगेचच त्याच ठिकाणी पुन्हा अवैध धंदे सुरु केले जातात असा अनुभव ग्रामस्थांना येत असल्याने कदाचित पोलीस व अवैध धंदे करणारांची ही जुगलबंदी तर नाही ना अशी शंका व्यक्त करत पोलीस व अवैध धंदेवाईक कदाचित खो, खो चा खेळ खेळुन अवैध धंदे बंद करण्याची मागणी करणाऱ्यांना वेड्यात तर काढत नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.
*************************************************
अवैध दारु विक्रेत्याला कारवाईसाठी आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा अफलातून सल्ला.
*************************************************
अंबे वडगाव गावातील अवैध धंदे बंद करण्यासाठी सुज्ञ नागरिकांनी व महिलावर्गातून आलेल्या तक्रारींची दखल घेऊन अंबे वडगाव येथील दिलीप जैन यांनी सत्यजित न्यूजच्या माध्यमातून वारंवार आवाज उठवला आहे. याची दखल घेऊन पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्यांना वेळोवेळी अंबे वडगाव येथील अवैध दारु विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पाठवले मात्र या अवैध धंदे करणाऱ्यांचे काही हितचिंतक हे कारवाईत ढवळाढवळ करत असतात असे दिसून येते तसेच मागील आठवड्यात कारवाई करण्यासाठी आलेल्या एका संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांने बसस्थानक परिसरातील एका दारु विक्रेत्याकडून मुद्देमाल हस्तगत करुन रितसर कारवाई केली परंतु संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने जाता, जाता तुम्ही दोघेही लंगडे आहेत म्हणून तुम्ही कुस्ती खेळुन घ्या व आमच्याकडे या म्हणजे पत्रकाराला कसा सिधा करायचा ते मी पाहून घेईन व तुमची डोकेदुखी कमी होईल असा अफलातून सल्ला अवैध दारु विक्री करणाऱ्या व्यक्तीला दिला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून कदाचित संबंधित पोलीस कर्मचारी व अवैध धंदे करणारांची अर्थपूर्ण मैत्री तर नाही ना अशी शंका निर्माण झाली आहे.
[संबंधित पोलीस कर्मचाऱ्याच्या विरोधात लवकरच मा. जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करण्यात येणार आहे.]