महाराष्ट्रातील ऊस दिल्लीत गुऱ्हाळ, सर्वसामान्य जनतेच्या पुढे आश्वासनांचे फराळ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२९/११/२०२४
निकाल लागुन पाच दिवस उलटले तरीही मुख्यमंत्रीपदाचा तिढा कायम असल्याने मुख्यमंत्री कोण होणार याकडे महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे. तसेच महाराष्ट्रातील मुख्यमंत्री ठरवण्यासाठी थेट दिल्लीत बैठका घेऊन सुद्धा अद्यापही तिढा सुटत नसल्याने महाराष्ट्रातील जनतेतून तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण वास्तविक पाहता महायुतीला जे यश मिळाले आहे ते फक्त आणि फक्त माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रयत्नामुळेच मिळाले आहे म्हणून एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्रीपदाचा मान मिळावा असे मत सर्वसामान्य जनतेच्या तोंडून ऐकावयास मिळते आहे.
*************************************************
“महाराष्ट्रातील ऊस दिल्लीत गुऱ्हाळ, सर्वसामान्य जनतेच्या पुढे आश्वासनांचे फराळ”
*************************************************
तसेच आता मुख्यमंत्री कोण याबाबत महाराष्ट्रात बरीच चर्चा झाली परंतु तोडगा निघाला नाही म्हणून सरतेशेवटी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद कोणाकडे सोपवावे म्हणून थेट दिल्लीत बैठका घेतल्या जात असल्या तरी महाराष्ट्रातील जनतेला एकनाथराव शिंदे हेच मुख्यमंत्री पाहिजे म्हणून बोलले जात असून मुख्यमंत्री कोणाला बनवायचे याकरिता दिल्लीत बैठका घेतल्या जात असल्याने “महाराष्ट्रातील ऊस दिल्लीत गुऱ्हाळ, सर्वसामान्य जनतेच्या पुढे आश्वासनांचे फराळ” अशी टीकेची झोड उठवली जात आहे.
*************************************************
महाराष्ट्राची वाटचाल बिहारच्या वाटेवर, महाराष्ट्र सरकार कधी येईल सत्तेवर.
*************************************************
एका बाजूला अद्यापही मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला नसल्याने दुसरीकडे मात्र जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रात अवैध धंदे, गुंडागर्दी वाढत चालली असून माफिया राज सुरु असल्याचे दिसून येते यात दारु, सट्टा, जुगार, चरस, भांग, गांजाची खुलेआम विक्री तसेच दिवसाढवळ्या विनापरवाना हत्त्यारे घेऊन फिरणे हत्यारांच्या जोरावर दहशत निर्माण करुन खुन, दरोडे, बलात्कार, अपहार अशा घटना घडत आहेत. विशेष म्हणजे हे गुंडागर्दी करणारे व माफियांच्या टोळ्या यांच्यावर कारवाई केली जात नसल्याने ते आता जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांना निशाण्यावर घेऊन त्यांच्यावर हल्ले करणे त्यांना शासकीय वाहनांवर वाहने चालवून जिवे मारण्याचा प्रयत्न करुन दहशत माजवणे असे प्रकार करत आहेत.
म्हणून लवकरात, लवकर मुख्यमंत्रीपदाचा तिढा सोडवून मंत्रिमंडळ स्थापन करुन महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी निर्णय घेतला जाऊन संपूर्ण महाराष्ट्रातील अवैध धंदे, गुंडागर्दी, माफियांराज संपुष्टात आणून लाडक्या बहिणी व सर्वसामान्य माणसाला मनमोकळेपणाने जीवन जगता येईल अशा पद्धतीने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी कडक अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.