मा. एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री बनवावे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी व जनतेतून एकमुखी मागणी.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२४
[आम्ही आमच्या भावाला म्हणजेच एकनाथराव शिंदे यांना पाहूनच मतदान केले म्हणून महायुतीला अभुतपुर्व यश प्राप्त झाले आहे असे सांगत केंद्रात काही असो परंतु महाराष्ट्रात महायुतीला जे अभुतपुर्व यश मिळाले आहे हे फक्त आणि फक्त एकनाथराव शिंदेंच्या चाकोरीबद्ध नियोजनामुळे व ते मुख्यमंत्री झाल्यानंतर जनहितार्थ घेतलेल्या तडकाफडकी निर्णयामुळेच मिळाले असल्याचे मत संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी व जनतेतून व्यक्त केले जात असून एकनाथराव शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्री बनवावे अशी मागणी महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी व जनतेतून केली जात आहे.]
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबर २०२४ शनिवारी नुकताच जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळून मोठे यश प्राप्त झाले असले तरी आता मात्र मुख्यमंत्री पदाबाबत मोठा पेच निर्माण झाला आहे. एका बाजूला एकनाथराव शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे याकरिता शिंदेंच्या शिवसेनेकडून आग्रही भूमिका घेतली जात आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या हालचाली सुरु आहेत. मात्र या चढाओढीत मुख्यमंत्री पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागले आहे.
यामध्ये महायुतीला निर्विवाद यश मिळाले. मात्र, गेल्या चार दिवसांपासून मुख्यमंत्रीपदबाबत पेच निर्माण झाला आहे. एकीकडे शिंदेची शिवसेना ही एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवावे, यासाठी आग्रही तर दुसरीकडे भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्याने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी केंद्रीय नेतृत्वाच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
************************************************
एकनाथराव शिंदेंच्या चाकोरीबद्ध नियोजनामुळे महायुतीला ऐतिहासिक यश.
********************************”***************
विधानसभा निवडणुकीत आज जरी महायुतीला ऐतिहासिक यश मिळाले असले तरी या यशामागे एकनाथराव शिंदेंचा वाटा मोठा असल्याचे मत महाराष्ट्रातील जनतेतून सांगितले जात आहे. कारण एकनाथराव शिंदे हे मुख्यमंत्री असतांना त्यांनी तडकाफडकी निर्णय घेत अनेक योजना अंमलात आणल्या म्हणून या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला १३२, शिंदेंच्या शिवसेनेला ५७ व अजित दादांच्या राष्ट्रवादीला ४१ जागांवर विजय मिळाला तर दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला व उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेला २०, राष्ट्रीय काँग्रेसला १६ व शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसला १० जागांवर समाधान मानावे लागले.
************************************************
मुख्यमंत्री पदाचा तिढा नेमका सुटणार तरी कधी ?
************************************************
महायुतीला निर्विवाद यश मिळाल्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून मुख्यमंत्री पदावरुन भारतीय जनता पक्ष व शिवसेत जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. कारण भारतीय जनता पक्षाला १३२ जागा मिळाल्याने मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस यांना बसवण्यात यावे याकरिता केंद्रातून आग्रह केला जात आहे. तसेच माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद व राज्यात उपमुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली असून एकनाथराव शिंदे यांनी या दोन्ही ऑफर नाकारल्याची माहिती समोर येत असून एकनाथराव शिंदे याची समजूत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाकडून केले जात आहेत कारण भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी पडद्यामागून जोरदार हालचाली सुरु असल्याचे खात्रीलायक वृत्त असून येत्या ४८ तासात मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
*************************************************
विरोधकांकडून महायुतीवर टीकेची झोड.
*************************************************
महायुतीला पुर्णपणे बहुमत मिळाले असूनही मोदी व शहांना अद्यापही मुख्यमंत्री निवडता येत नाही असे म्हणत उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका केली आहे. तसेच मुख्यमंत्री पदाच्या निवडीला विलंब होत असल्याने सुप्रिया सुळे यांनी देखील महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे.