शिरस्त्राण नसलेल्या दुचाकीस्वारावर मोटार वाहन अधिनियम १९८८ नुसार कारवाईचे आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२७/११/२०२४
मा. सर्वोच्च न्यायालय सुरक्षा समितीच्या माध्यमातून रस्त्यावर होणारे अपघात या अपघातात वाहनचालक व सोबतच्या व्यक्तींचे होणारे मृत्यू तसेच जखमींची संख्या याबाबत मागील पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला या आढाव्यात असे आढळून आले आहे की बरेचसे दुचाकीस्वार व दुचाकीवर मागे बसणारे हे शिरस्त्राण (हेल्मेट) वापरत नसल्याने अपघात झाल्यास मृत्यू होणे व जखमी झालेल्यांची संख्या झपाट्याने वाढत चालली असल्याचे दिसून असले तरी वाहतूक नियमांची अंमलबजावणी करतांना ई चालान मशिन मध्ये विना शिरस्त्राण व दुचाकीवर मागे बसणारे यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईची माहिती उपलब्ध होत नव्हती म्हणून नियमांची पायमल्ली करणारांवर कारवाई केली जाते की नाही हा प्रश्न अनुत्तरित दिसून येत होता.
म्हणून वाढते अपघात व अपघातात मृत्यू व जखमी होण्याचे वाढते प्रमाण लक्षात घेता हे थांबविण्यासाठी
मा. सर्वोच्च न्यायालयाच्या रस्ते सुरक्षा दिलेल्या सुचना व उद्दिष्टांची माहिती सर्व अधिकार व आमदारांनी घेऊन सेक्शन १२८ आणि १२९ मोटार वाहन कायदा १९८८ कायद्याची प्रभावीपणे व कडक अंमलबजावणी करण्यात यावी अशा आशयाचे पत्राद्वारे अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक) विभाग महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिनांक २५ नोव्हेंबर २०२४ सोमवार रोजी मा. पोलीस आयुक्त व संपूर्ण महाराष्ट्रातील संबंधित विभागाकडे देण्यात आले असून कारवाई करतांना अडचणीचे ठरू नये म्हणून ई चालान मशिन मध्ये सेक्शन १२९/१९४ (डी) मोटार वाहन कायदा शिर्षकांमध्ये बदल करण्यात आला असल्याने विना शिरस्त्राण दुचाकीवर व मागे बसणाऱ्या व्यक्तीवर या आदेशाची कडक अंमलबजावणी व्हावी जेणेकरुन वाहनधारकांना शिस्त लागून अपघातातील मृतांची व जखमींची संख्या कमी होईल अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.