पिंपळगाव हरेश्वर परिसरात शैक्षणिक संस्था उघडून नोकरी देण्याचे आमिष, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक होण्याची शक्यता.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२४
नुकत्याच विधानसभा निवडणुका संपल्या असून या निवडणुकीत भल्याभल्यांनी एखाद्या उमेदवाराला हाताशी धरुन लाखो रुपये कमाई करुन घेतली आहे. परंतु आता निवडणुका संपल्या असल्याने संबंधित बऱ्याचशा टाळुवरचे लोणी खाणाऱ्या दलालांना आपल्या पोटापाण्याचा प्रश्न कसा सोडवायचा हा प्रश्न पडला असेल्याने अश्याच एका छक्केपंजे खेळणाऱ्या व्यक्तीने एक नवीन खेळी सुरु केली असून मी शिक्षणसम्राट उमेदवाराचा उजवा हात असल्याचे सांगत पिंपळगाव हरेश्वर गावात लवकरच शैक्षणिक संस्था सुरु करायची आहे असे सांगून आम्ही तुम्हाला नोकरी देऊ परंतु तुम्हाला आमच्या पक्षात प्रवेश घेऊन आमचे काम करावे लागेल असे अमिष देत गावागावांतील तरुणांना ‘आंधळी कोशिंबीर’ सारखा खेळ खेळुन नोकरीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
यामुळे कदाचीत भविष्यात सुशिक्षित बेरोजगारांची आर्थिक फसवणूक होऊ शकते अशी भीती पिंपळगाव हरेश्वर गावासह परिसरातील गावागावांतील सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली असून अशा भूलथापा देणाऱ्या इसमावर कुणीही भरवसा ठेऊ नये अशी विनंती केली आहे.
(सदर प्रकरणी पुरावे मिळाल्यावर याबाबत सविस्तर वृत्त थोड्याच दिवसात.)