विजयी मिरवणुकी दरम्यान रस्त्यावर उभ्या असलेल्या महिलांचा विनयभंग २४ व्यक्तींविरोधात पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२६/११/२०२४
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर सगळीकडे विजयी उमेदवारांची विजयी मिरवणूक काढण्यात आली तर काही ठिकाणी विजयी उमेदवारांच्या उत्साही कार्यकर्त्यांनी ढोल, ताशा पथक व डी. जे. च्या वाद्य लावून शहरातील मुख्य रस्ते व गल्लीबोळातून मिरवणूका काढत जोरदार घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत आनंद साजरा केला.
मात्र पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील आमदार किशोर आप्पा पाटील हे विजयी झाल्यानंतर त्यांच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी काढण्यात आलेली विजयी मिरवणूक श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मानसिंगका कॉर्नर येथून पुढे शिवाजीनगर परिसरातून जात असतांना याच रस्त्यावर पाच ते सहा महिला रस्त्याच्या कडेला गप्पा मारत उभ्या होत्या विजयी मिरवणूक डी. जे. च्या कर्कश आवाज पुढे जात असतांना मिरवणूक थांबवून हेतू पुरस्कार बाप तो बाप रहेंगा हे गाणे वाजवले जात होते मिरवणूक एकाच ठिकाणी जास्त वेळ थांबल्याने डी. जे. च्या कर्कश आवाजाचा त्रास सहन झाल्याने जवळच उभ्या असलेल्या महिलांनी त्यांना पुढे जाण्यासाठी सांगितले होते.
याचा राग येऊन तीन ते चार उत्साही लोकांनी उभ्या असलेल्या तीन ते चार महिलांच्या अंगावरील कपडे ओढून महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे वेगवेगळे हावभाव करत आमच्या हाताला धरुन डी. जे. च्या गाण्यावर नाचण्यासाठी ओढण्याचा प्रयत्न केला व याच वेळी आमची साडी ओढून आम्हाला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केला हा प्रकार थांबविण्यासाठी आम्ही समंजस व्यक्तीला सांगितले व गैरकृत्याची माहिती दिली व आम्हाला लाज वाटेल असे कृत्य करणाऱ्या बद्दल सांगीतले होते असे महिलांनी सांगितले परंतु आमच्या तक्रारींकडे कुणीही लक्ष दिले नाही उलट आमदार आमचाच आहे पुढील पाच वर्षे आमचीच आहेत असे सांगून पुन्हा डी. जे. च्या वाद्यावर बेधुंद नाचत अश्लील हावभाव करत पुढे निघून गेल्याची तक्रार त्रस्त महिलांनी पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली असल्याचे सांगितले जात आहे.
या तक्रारीवरुन एक ते २४ संशयित आरोपींविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये कलम ७४, ७६, १८९, १९१(१), १९१(२), १९०, ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दळवी साहेब करीत आहेत.