पाचोरा तालुक्यातील शिक्षण विभागातील भ्रष्टाचार निपटून काढण्यासाठी आ. किशोर आप्पा पाटील यांना शिक्षणमंत्री पद द्यावे.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२४/११/२०२४
विधानसभा निवडणुकीत पाचोरा, भडगाव मतदारसंघात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बहुमताने आघाडी मिळवून हॅटट्रिक केली आहे. म्हणून त्यांची मंत्रिमंडळत वर्णी लागुन नक्कीच मंत्रीपद बहाल केले जाईल अशी अपेक्षा पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेतून केली जात असून निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच ग्रामविकास मंत्री असे फलक आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नावाने लावण्यात आले होते.
तसेच आमदार किशोर आप्पा पाटील यांना शिक्षणमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी केली जात असून जर का किशोर आप्पा पाटील यांना शिक्षणमंत्री पद मिळाले तर ते नक्कीच पाचोरा, भडगाव तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील विशेष करुन जळगाव जिल्ह्यातील क म्हणता ढ न येणाऱ्यांची नियुक्ती करुन बोगस शिक्षक भरती व हि बोगस शिक्षक भरती करणारे दलाल व यांच्यामार्फत करोडोंची माया जमा करुन या पैशांवर भुजंगासन करुन बसलेल्या संस्थाचालकाचे पितळ उघडे करुन शिक्षक भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना न्याय मिळवून देतील तसेच मागील काळात बोगस टी. ई. टी. भरती करणाऱ्या दलालांवरची प्रलंबित असलेल्या कारवाईला गती येऊन नवीन नियमानुसार पोर्टलवर शिक्षक भरती केली जाईल व यामुळे विद्यार्थ्यांंची शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तसेच ज्यांनी, ज्यांनी या अगोदर मंत्रीपदे भुषविले आहेत त्यांना परत, परत मंत्रीपद न देता नवीन आमदारांना मंत्री पदावर नियुक्ती करण्यात यावे अशी सर्वसामान्य जनतेच्या मनातून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.