निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच किशोर आप्पा पाटलांना मंत्रीपद बहाल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत एकुण १२ उमेदवार उभे असून यापैकी खरी लढत महायुतीचे उमेदवार आमदार किशोर आप्पा पाटील, महाविकास आघाडीच्या उमेदवार सौ. वैशालीताई सुर्यवंशी, अपेक्ष उमेदवार माजी आमदार दिलीप भाऊ वाघ व अमोल भाऊ शिंदे यांच्यामध्ये चुरशीची होतांना दिसून येत असतांनाच माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांनी ऐनवेळी घुमजाव केल्याच्या चर्चेमुळे पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेतून कमालीचा संताप व्यक्त केला जात होता.
याच चढाओढीत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून आता कोण निवडून येईल याबाबत वेगवेगळे अंदाज वर्तविण्यात येत आहेत. यात काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून आमदार किशोर आप्पा पाटील हेच आघाडीवर असल्याचे तर काही प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून अमोल भाऊ शिंदे हेच बहुमताने निवडून येतील अश्या बातम्या सगळीकडे फिरत आहेत. मात्र या दोघांच्या चढाओढीत कदाचित सौ. वैशालीताई सुर्यवंशी या बाजी मारुन जातील अशीही शक्यता नाकारता येत नाही.
असे असले तरी मात्र निवडणूक निकाल लागण्याआधीच काही उत्साही कार्यकर्त्यांनी गावात आमदार किशोर आप्पा पाटील यांना चक्क भावी ग्रामविकास मंत्री पद बहाल करुन तसा अभिनंदनाचा फलक भडगाव शहरासह पाचोरा तालुक्यातील बाळद बुद्रुक गावात लावण्यात आला असल्याचे खात्रीलायक वृत्त असून पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेतून हा एक कुतुहलाचा विषय ठरला आहे.