लाखो रुपये खर्च करुनही भडगाव तालुक्यातील उमेदवारावर गयी भैंस पानी में, असे म्हणण्याची वेळ.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२२/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भडगाव तालुक्यातील नव्यानेच राजकीय आखाड्यात उडी घेतलेले व निवडणुकीत उमेदवारी केल्यानंतर निवडून येण्यासाठी सगळेच उमेदवार सर्वोतोपरी प्रयत्न करतात यासाठी विश्वासू सहकारी व हितचिंतकांची फळी उभारुन त्यांच्या खांद्यावर प्रचारासाठी जबाबदारी सोपवली जाते. म्हणून संबंधित उमेदवाराने अशीच एक फळी उभारुन पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील गावागावात आपल्या कार्यकर्त्यांना कामाला लावून प्रचारासाठी तयारी दाखवली होती.
याचाच फायदा घेत या निवडणुकीदरम्यान पाचोरा तालुक्यात एका मोठ्या लोकसंख्येच्या गावातील लबाड धंदे करुन बदनाम असलेल्या एका व्यक्तीने आपल्या सोबत भाडोत्री स्तुती पाठक घेऊन संबंधित उमेदवाराच्या घरी जाऊन भेट घेतली याचवेळी सोबत आणलेल्या स्तुती पाठक मित्रांनी आपल्या कार्यकर्त्यांचे पोवाडे गायीले हे पोवाडे ऐकून भडगाव तालुक्यातील संबंधित उभे असलेल्या उमेदवारांने संबंधित व्यक्तीच्या खांद्यावर पाचोरा तालुक्यातील काही मोठ्या लोकसंख्येच्या गावातील प्रचारासाठी जबाबदारी सोपवली व मला निवडून आणण्यासाठी मी वाट्टेल तेवढा खर्च करण्यासाठी व पाहिजे ते करण्यासाठी तयार असल्याचे ठासून सांगितले होते.
याचाच फायदा घेत पाचोरा तालुक्यातील संबंधित व्यक्तीने मतदानाच्या काही दिवस अगोदर मोठ्या लोकसंख्येच्या गावातील काही लोकांना सोबत घेऊन जात आम्ही किती मते मिळवून देऊ शकतो याची शाश्वती देत इतर प्रतिस्पर्धी उमेदवार मते मिळवून घेण्यासाठी मतदारांना ओल्या पार्ट्या व रोख रक्कम देऊन वारेमाप पैसा खर्च करत आहेत म्हणून आपल्यालाही मते मिळवून घेण्यासाठी खर्च करावाच लागेल असे सांगून आपण जर खर्च केला तर आम्ही तुम्हाला मोठ्या प्रमाणावर मते मिळवून देऊ असे सांगितले तेव्हा निवडणुकीचे कोणतेही डावपेच माहिती नसल्यामुळे संबंधित उमेदवाराने संबंधित व्यक्तीला जवळपास वीस लाख रुपये दिले असल्याची माहिती समोर आली आहे.
मात्र संबंधित व्यक्तीने निवडणुकीत मते मिळवून घेण्यासाठी गोरगरिबांना पाचशे ते हजार रुपये देऊन ठराविक प्रमाणात पैशांची वाटप करुन आणलेल्या वीस लाख रुपया पैकी फक्त आणि फक्त पाच लाख रुपयांची बोळवण करुन उर्वरित पंधरा लाख रुपये हडप केल्यामुळे संबंधित उमेदवाराने दिलेल्या पैशांच्या मोबदल्यात अपेक्षित असलेली मत मिळाली नसल्याने ते या निवडणुकीत पराजीत होणार आहेत म्हणून त्यांना हार मानावी लागेल अशी चिन्हे दिसत असल्याने वीस लाख रुपये खर्चूनही मते न मिळाल्याने त्यांच्या पदरी निराशाच येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही म्हणून संबंधित उमेदवारावर (गयी भैंस पानी में) असे म्हणण्याची वेळ येणार आहे.
“बाप दाखव नाही तर श्राद्ध कर”
संबंधित व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे प्रचार न करता व पैशांचे वाटप केले नसल्याची बाब संबंधित उमेदवाराला माहित झाली असून संबंधित उमेदवाराकडून दिलेल्या रकमेचा लेखाजोखा विचारला जाणार असून ज्या कामासाठी ज्या अपेक्षेने पैसे दिले होते ते काम पूर्ण न झाल्यामुळे जसे दिले तसेच पैसे वसूल केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी खमंग चर्चा भडगाव तालुक्यातील संबंधित उमेदवाराच्या कार्यालयात सुरु असल्याचे सांगितले जात असून या गैरप्रकारांबाबत पिंपळगाव हरेश्वर येथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींकडे काही ठोस पुरावे हाती लागले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.