मतदान केंद्रात भ्रमणध्वनीचा सर्रास वापर, मतदान केंद्रावर नियुक्त अधिकाऱ्यांची मुक संमती.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~२०/११/२०२४
आज विधानसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया सुरु झाली असून ही प्रक्रिया निःपक्षपाती पणाने पार पडावी म्हणून स्वतंत्रपणे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. असे असले तरी सगळीकडे आचारसंहिता नियमांचे उल्लंघन होतांना दिसून येत असल्याने सुज्ञ नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे.
यात पाचोरा मतदारसंघातील अंबे वडगाव, वरखेडी, शिंदाड, पिंपळगाव हरेश्वर, जामनेर मतदारसंघातील शेंदुर्णी, कळमसरा, पहूर, कुऱ्हाड खुर्द या ठिकाणच्या मतदान केंद्रावर भेट दिली असता बऱ्याचशा ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या बुथ प्रमुखांकडे तसेच जेष्ठ नागरिकांना मदतादासाठी घेऊन जाणाऱ्या स्वयंसेवकांकडे
भ्रमणध्वनी असल्याचे दिसून आले.
यामुळे आत काय चालले आहे ते बाहेर व बाहेर काय चाललंय याची आतमध्ये माहिती दिली जात असल्याने
एखाद्यावेळी वादविवाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मतदान केंद्रावर व आतमध्ये भ्रमणध्वनी वापरले जात असल्याने आपापसात वाद वाढत असतांना दिसून येत आहे. म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधितांना योग्य त्या सुचना देत गरजेचे आहे. कारण दुपारनंतर मतदान केंद्रावर मतदाराची संख्या वाढणार असल्याने या गैरप्रकारांना आधीच आळा घालण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.