वाढती गुंडगिरी मोडून काढण्यासाठी परिवर्तनाला साथ द्या, व्यापारी मेळाव्यात अमोल शिंदे यांचे आवाहन.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२४
पाचोरा, भडगाव मतदारसंघांचे विद्यमान आमदार किशोर पाटील यांच्या कार्यकाळात अवैध धंदे व गाव, गुंडाचा हैदोस वाढला असून समाजातील सर्वसामान्य नागरिक व व्यापारी बांधवांसाठी ही बाब धोकादायक असल्याचे सांगत अवैध धंदे बंद व गाव, गुंडांची गुंडागर्दी मोडून काढण्यासाठी व्यापारी बांधवांनी अनुक्रमांक ७ या शेतकरी चिन्हा समोरील बटन दाबून मला साथ द्यावी असे आवाहन लोकप्रिय अपक्ष उमेदवार अमोल पंडितराव शिंदे यांनी दिनांक १७ नोव्हेंबर २०२४ रविवार रोजी ज्येष्ठ उद्योजक रतनचंदजी संघवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या मेळाव्यात केले.
या मेळाव्याच्या सुरवातीला महेंद्र संचेती, सदाशिव आबा पाटील, राजेश मोर, रमेश शेट वाणी, प्रदिप संचेती, कांतीलाल जैन यांनी अपक्ष उमेदवार अमोल शिंदे यांच्या कार्यकाचा गौरव केला. तदनंतर अमोल शिंदे यांनी मागील पाच वर्षांपासून सत्तेवर नसलो तरी मी पाच वर्षे सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी अविश्रांत काम केले असल्याचे सांगत केलेल्या कामांचा आढावा व्यापाऱ्यांसमोर मांडला. पुढे बोलतांना अमोल शिंदे म्हणाले की निवडणुक काळात आमदार किशोर आप्पा पाटील हे बेताल वक्तव्य करत असून मागील दहा वर्षात माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांवर साधी एन. सी. सुध्दा दाखल नसतांनाही ते माझ्या व माझ्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत जनमानसात गैरसमज काम मागील काळात केले व आताही गैरसमज पसरवत आहेत. यामागील कारण म्हणजे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली असून गाव, गुंडांना प्रोत्साहन देऊन समाजात व व्यापारी पेठेतील शांतता बिघडवणाऱ्या आमदारांनी दुसऱ्याकडे बोट करण्याआधी आत्मपरीक्षण करावे असे सांगत ही गुंडागीरी व दहशत मोडून काढण्यासाठी आता आपण सज्ज झाले पाहिजे असे सांगून आमदार किशोर आप्पा पाटील यांचा खरपूस समाचार घेतला.
या मेळाव्यात महेंद्र शेठ संचेती, बंकट शेठ लोढा, कांतीलालजी श्रीश्रीमाळ, सुभाष रांका, राजेश मोर, प्रदीप शेठ संचेती, सुनील शेठ मोर, शेख सलीम शेख नईम, मोटुमल नागराणी, शामसुंदर खंडेलवाल, राधेश्यामजी प्रजापत, राजेंद्र पटवारी, मुस्तफा भाई लकडावाला, मुस्लिम भाई बागवान, विजय वाणी, रमेश वाणी, सतीश बापू शिंदे, दिनेश अग्रवाल, गुलाब पंजवाणी, सुनील मोर, स्वतंत्र जैन, शामभाऊ खंडेलवाल, बन्सीलाल बापू पाटील, प्रदीप बापू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
या व्यापारी मेळाव्याचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन डॉ. प्रा. शिवाजी शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन नीरज जैन यांनी केले. या मेळाव्यात पाचोरा, भडगाव तालुक्यातील व्यापारी उद्योजक, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.