सत्यजित न्यूज

Main Menu

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत

logo

सत्यजित न्यूज

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपलं जळगाव
  • संपादकीय
  • फिल्मी दुनिया
  • मनोरंजन
  • राजकीय
  • कृषी विषयक
  • क्राईम जगत
  • बोगस शिक्षक भरती प्रकरणी धापेवाडा येथील भाजपच्या माजी तालुका अध्यक्षाला अटक.

  • गुटखा प्रकरणी आरोपीच्या दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत, पाचोरा पोलीसांच्या हाती मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता.

  • पोलीस कारवाई होताच दोघे गुटखा किंगचा झाला समेट , एकाने पोलीस स्टेशनला जाऊन वाहनचालकाची घेतली भेट.

  • पोलीसांनी गुटखा पकडला मात्र गुटखा किंगवर ठोस कारवाई कधी ?

  • जळगावच्या महिलेकडून अंबे वडगाव येथील प्लॉट धारकांची फसवणूक, पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.

ब्रेकिंग न्यूज
Home›ब्रेकिंग न्यूज›मतदानाच्या अंतीम टप्प्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांच्या माध्यमातून जनतेशी साधला संवाद.

मतदानाच्या अंतीम टप्प्यात आमदार किशोर आप्पा पाटील यांनी पत्रकारांच्या माध्यमातून जनतेशी साधला संवाद.

By Satyajeet News
November 18, 2024
0
0
Share:
Post Views: 150
Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१८/११/२०२४

पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात मागील दहा वर्षात विकासाची गंगा आणून पाचोरा, भडगाव शहर व दोघेही तालुक्यातील प्रत्येक गावातील म्हणजेच ग्रामीण भागात सर्वांगीण विकास करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला यावेळी त्यांनी सांगितले की गेल्या दहा वर्षांच्या काळात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन घेत पाचोरा, भडगाव शहर व दोघेही तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली तसेच आता अडीच वर्षांच्या कालावधीत पाचोरा, भडगाव मतदारसंघातील सर्वांगीण विकासासाठी तब्बल तीन हजार कोटी रुपयांचा निधी आणून सर्वांगीण विकास करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदीवरील बंधारे, मंजूर झालेली एम. आय. डी. सी. व सुत गिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी माझा प्रयत्न राहील तसेच पुढील पाच वर्षांत पाचोरा, भडगाव मतदारसंघातील विकासकामांचा एक पॅटर्न मला पूर्ण करायचा असल्याचे मत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मतदानाच्या अंतिम टप्प्यात पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

तसेच पुढे बोलतांना आमदार किशोर आप्पा पाटील म्हणाले की पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेने माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवून सतत दोन वेळा विधानसभेत पाठवले जनतेने दाखवलेल्या या विश्वासाला तडा न जाऊ देता मी पाचोरा, भडगाव शहर व दोघेही तालुक्यातील प्रत्येक गावागावात मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याने मी मायबाप जनतेच्या विश्वासाला पात्र ठरल्याने मायबाप जनता मला तिसऱ्यांदा विधानसभेत पाठवेल असा मला शंभर टक्के विश्वास असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले
************************************************
पाचोरा, भडगाव शहराचा चेहरामोहरा बदलवला.
************************************************
शेवटच्या अडीच वर्षांत पाचोरा शहरात भूमिकेत गटार योजना, रस्ते कॉंक्रीटीकरणचा डी. पी. आर. खुल्या जागेत विकास, पाचोरा शहरातील वाढता व्यापर, उद्योग लक्षात घेऊन शहरातील उद्योग, व्यवसाय भरभराटीला जावा म्हणून विविध व्यापारी संकुलनाची निर्मिती, स्वतंत्रपणे भाजी मार्केट, हिवरा नदीवरील पूलाचे बांधकाम, वाचनालय, व्यापारी भवन, क्रीडा संकुल, अल्पसंख्याक भागात केलेली कोट्यावधींची कामे, जनता वसाहत भागातील बौद्ध विहारात सभामंडप, पेव्हर ब्लॉक यासह मागासवर्गीय वस्तीत झालेली विकासकामे, प्राचीन प्रभू श्रीराम मंदिर परिसराचा विकास, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका, महाराणा प्रताप चौक ते रेल्वे उड्डाणपूलापर्यंत रस्त्यावर सुशोभीकरणाचे काम असे एक नव्हे तर शेकडो विकास कामे करण्याचा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला तसेच येथेच न थांबता

भडगाव शहर व तालुक्यातील विकासकामांच्या बाबत सांगायचे झाल्यास भडगाव शहरासाठी १३३ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना, ८३ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन घेत भूमिगत गटार योजना, सर्व खुल्या भुखंडांचा केलेला विकास, तळणी व श्री. स्वामी समर्थ मंदिराचे पर्यटन विकासाच्या माध्यमातून सुरु असलेले काम, साई मंदिर परिसरात करण्यात आलेली कामे, मुख्य रस्त्यांचे कॉंक्रीटीकरणाचे झालेले व उर्वरित काम मार्गी लावण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच तब्बल १७० कोटींच्या रस्ता कॉंक्रीटीकरणचा डी. पी. आर.‌ मंजूरीच्या अंतीम टप्प्यात असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी यावेळी सांगितले.
***********************************************
ग्रामीण भागाचाही साधला विकास.
************************************************
पाचोरा, भडगाव शहरांच्या विकासा सोबतच दोघेही तालुक्यातील ग्रामीण भागातील विकास साधण्याचे काम केले आहे. ही विकासकामे करत असतांना प्रत्येक गावातील चौक सुशोभीकरण, प्रत्येक गावात शिवस्मारक, मागणी नुसार काही गावांमध्ये वीर एकलव्य स्मारक, पाणीपुरवठा योजना, व्यायाम शाळा, व्यायामाचे आधुनिक साहित्य अशी समाजाभिमुख कोट्यावधी रुपयांची कामे पुर्णत्वास नेली आहेत. याशिवाय गडद, अग्नावती, तितूर नद्यांसह छोट्या, छोट्या नदी नाल्यांवर शेकडो बंधारे बांधून शेती समृद्ध करण्याचे काम केले. यात गिरणा नदीवरील तब्बल सात ठिकाणी पुल बांधले, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून पहुर ते पाचोरा रस्त्याच्या कामासाठी ३०० कोटी रुपये मंजूर केले असून सगळीकडे रस्त्याचे जाळे विणले. ३८० किलोमीटर लांबीचे शेत, पाणंद रस्ते मंजूर करण्यात आले असल्याचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.
************************************************
आर. टी. ओ. कार्यालयाने भडगाव तालुक्याची जगभरात ओळख.
*************************************************
पाचोरा, भडगाव तालुक्यातील वाहनधारकांना वाहनांची नोंदणी व इतर बाबतीत येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शासनाने चाळीसगाव येथे आर.‌ टी.‌ ओ. मंजूर केले असतांनाही भडगाव येथे मागील दहा वर्षांपासून आर. टी. ओ. कार्यालयाची मागणी लक्षात घेऊन भडगाव येथे तीसरे आर. टी. ओ. कार्यालय मंजूर करुन घेत भडगाव तालुक्याची देशभरात ओळख निर्माण केली.‌ यासोबतच नगरदेवळा सुत गिरणी जवळ एम. आय. डी. सी. मंजूर करुन घेत त्यासाठी २५० हेक्टर जमीन अधिग्रहण करण्यात आली आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील जनतेसाठी उपजिल्हा रुग्णालयाला मंजूर मिळवून घेत या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून भडगाव येथील सुसज्ज असे रुग्णालय बांधण्यासाठी जागा निश्चित करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
************************************************
आप्पांचे विकासाचे व्हिजन
*************************************************
पुढच्या टप्प्यात पाचोरा व भडगाव तालुक्यात गिरणा नदीचे जास्तीचे पाणी मतदारसंघात आणण्यासाठी नार, पार नदीजोड प्रकल्प राबवून गिरणा नदीवर पक्के बंधारे बांधणे, एम. आय. डी. सी. च्या माध्यमातून मोठे उद्योग उभारुन या बेरोजगारांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, भडगाव शहरात श्री. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे पुतळा उभारणे, पाचोरा शहरात खुले न्हाऊ, इगतपुरीच्या धर्तीवर विपश्यना केंद्र, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, शिवसृष्टी, भडगाव शहरातील रस्त्यांवर १७० डी. पी. आर. मंजूरीसह विविध विकास कामांचे स्वप्न उराशी बाळगून असल्याचे मत आमदार किशोर आप्पा पाटील यांनी बोलून दाखवले.‌
*************************************************
पुढील व्हिजन
*************************************************
पुढील व्हिजन बाबत बोलतांना त्यांनी सांगितले की मायबाप जनता आपण केलेल्या विकासकामांची दखल घेऊन कोणाच्याही भुलथापांना बळी न पडता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आपण केलेल्या कामांची पावती मतदान रुपाने देऊन मला पुन्हा सेवा करण्याची संधी उपलब्ध करुन देतील असा माला दृढ विश्वास असल्याचे देखील यावेळी आमदार किशोर आप्पा पाटील यांनी सांगितले.

Download WordPress Themes Nulled and plugins.
Previous Article

चारित्र्यावर संशय घेत पतीने केला पत्नीचा खून, ...

Next Article

भडगाव तालुक्यातील एका शैक्षणिक संस्थेच्या प्रांगणात मटण ...

0
Shares
  • 0
  • +
  • 0
  • 0
  • 0
  • 0

Satyajeet News

Related articles More from author

  • ब्रेकिंग न्यूज

    माजी आमदार दिलीप भाऊ वाघ यांना मनोज जरांगे पाटलांची मूकसंमती.

    November 4, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    अंबे वडगाव येथे उद्या घेण्यात येणाऱ्या ग्रामसभेत अवैध धंद्याचा विषय वादळी ठरणार.

    November 29, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच किशोर आप्पा पाटलांना मंत्रीपद बहाल.

    November 22, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    भुसावळ शहरात एक दुजे के लिए, प्रेमीयुगुलाच्या आत्महत्येमुळे सर्वत्र हळहळ.

    February 4, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    पाचोरा तालुक्यातील संशयित राईस मिल व स्वस्त धान्य दुकानदारांच्या चौकशीसाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाकडे तक्रार दाखल होण्याची शक्यता.

    March 19, 2024
    By Satyajeet News
  • ब्रेकिंग न्यूज

    नायलॉन मांजा उत्पादन, साठवणूक, विक्री व मांजा बाळगणे याविरोधात कृतिदल स्थापन करण्यासाठी पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी.

    January 5, 2023
    By Satyajeet News

You may interested

  • Uncategorized

    सिंधूताई सपकाळ यांचे निधन : अनाथांच्या मायेचा झरा आटला.

  • राजकीय

    सात मार्च सोमवार रोजी पाचोरा येथे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन.

  • आपलं जळगाव

    खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या प्रयत्नाला यश, देवळाली भुसावल शटल लवकरच पूर्व निर्धारित वेळेनुसार धावणार.

दिनदर्शिका

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Counter


मुख्य संपादक

दिलीप फुलचंद जैन.

मो.नं-9975666521

मु. पो. वडगाव अंबे ता. पाचोरा

सूचना

सत्यजित न्यूज मधील बातम्या जाहिरातीशी संपादक तसेच संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही, न्यायक्षेत्र पाचोरा, जि- जळगाव   CopyRight C-2020 सत्यजित न्यूज