माता भगिनींनी पाठीवर ठेवून हात, सांगितले अमोल भाऊ तुलाच देऊ साथ.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमदे उमेदवार अमोल पंडितराव शिंदे हे शेतकरी निशाणीवर निवडणूक लढवत असून त्यांचा क्रमांक सात हा आहे. अमोल शिंदे यांनी उमेदवारी जाहीर केल्यापासून त्यांनी भडगाव, पाचोरा शहरांसह गावागावांतील गल्लीबोळात फिरुन मतदारांना आपला जाहीरनामा देत मतदान मागत असून आज दिनांक १६ नोव्हेंबर २०२४ शनिवार रोजी पाचोरा येथील नागरिवसाहत भागात फिरुन मतदारांशी संवाद साधला यावेळी नारिवसाहत भागातील रहिवाशांनी अमोल शिंदे यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होऊन जोरदार घोषणाबाजी करत प्रतीसाद दिला यावेळी घोषणांनी नागरिवसाहत परिसर घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
अमोल शिंदे यांनी आज सकाळी कैलादेवीचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करत प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली ही प्रचार रॅली पुढे शिवतीर्थ परिसर, एम. एम. कॉलेजच्या पाठीमागील नागरी वसाहत, जिजामाता कॉलनी, दुर्गा नगर, विवेकानंद नगर, पाटील नगर व नागरीवसात भागातून काढण्यात आली या रॅली दरम्यान संपूर्ण परिसर अमोल भाऊ ‘आगे बढो हम तूम्हारे साथ है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. अमोल शिंदेंच्या स्वागतासाठी घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या तसेच घराघरातील माता, भगिनींनी अमोल शिंदे यांचे औक्षण पाठीवर हात ठेवून विजयासाठी आशिर्वाद दिला.
या प्रचारफेरीत शेकडो तरुण युवक, माता भगिनी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या प्रचारफेरीतील गर्दी म्हणजे नक्कीच परिवर्तनाची लाट असून नक्कीच परिवर्तन घडेल अशी भावना मतदारांनी बोलून दाखवली असल्याने अमोल शिंदे नक्कीच विजयी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.