लग्नाचे आमिष दाखवून तरुणीची फसवणूक, पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल.
दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१७/११/२०२४
पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील एका तरुणाने त्याच्याच समाजातील एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून लग्नाचे आमिष दाखवून तीच्याशी मागील एक वर्षापासून पटेल तेव्हा, भेटेल तेथे शारीरिक संबंध प्रस्थापित केले नंतर संबंधित तरुणीने संबंधित तरुणाकडे लग्न करण्यासाठी तगादा लावला असता संबंधित तरुणाने आज, उद्या करत, करत तब्बल एक वर्ष घालवून लग्न करण्यास नकार दिल्याने व गावातून पळ काढल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संबंधित तरुणीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन रितसर तक्रार दाखल केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पाचोरा तालुक्यातील कुऱ्हाड बुद्रुक येथील एकाच समाजातील दोन कुटुंब शेजारी शेजारी रहात आहेत. एकाच समाजातील असल्याने दोघह कुटुंबातील सदस्यांचे एकमेकांच्या घरी जाणे, येणे सुरु होते याच कालावधीत दोघ कुटुंबातील सज्ञान असलेले तरुण, तरुणी यांची ओळख झाली व ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले एकाच समाजातील असल्याकारणाने दोघेही परिवारातील सदस्यांनी पाहीजे तेवढे लक्ष दिले नाही.
याच कालावधीत संबंधित तरुणाने, तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून भेटेल तेथे, पटेल तेव्हा शारीरिक संबंध प्रस्थापित केले याच कालावधीत संबंधित तरुणीने त्या तरुणाकडे लग्न करण्यासाठी तगादा लावून धरला तेव्हा आपण पळून जाऊन लग्न करु असे आश्वासन दिले होते. तसेच यांच्या प्रेम कथा दोघेही कुटुंबातील सदस्यांना माहीत झाल्यावर सामाजिक बैठकीत दोघांचेही लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु तरीही संबंधित कुटुंबाकडून लग्न करण्यासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला ही बाब तीच्या आईवडीलांच्या लक्षात येताच त्यांनी तीला गळफास घेतांना वाचवले व तीला धीर देत संबंधित तरुणाच्या कुटुंबाकडे लग्न करुन घेण्यासाठी तगादा लावला होता.
परंतु नंतर संबंधित तरुणाने लग्नास नकार दिल्याने तरुणीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला रितसर तक्रार देण्यासाठी गेली असता संबंधित तरुणाने पोलीस स्टेशनला जाऊन तु तक्रार करु नकोस मी आठ दिवसांत तुझ्याशी लग्न करेन असे सांगून घरी परत आणले होते. मात्र आठ दिवस उलटले तरीही संबंधित तरुणाने लग्न करण्यासाठी प्रतिसाद दिला नाही व तो गावातून पळून गेला असल्याने तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्य उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने संबंधित तरुणीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तीने पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला जाऊन लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी आकाश शांताराम ठाकरे या तरुणाविरोधात रितसर तक्रार दाखल केली असून याप्रकरणी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश काळे व त्यांचे सहकारी पुढील तपास करीत आहेत.