पाचोरा विधानसभा निवडणुकीत दिलीप भाऊ वाघ यांना उस्फुर्त प्रतिसाद.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१६/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात माजी आमदार दिलीप वाघ पुन्हा विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. त्यांचा अनुक्रमांक नऊ असून “शिट्टी” हे त्यांचे उमेदवारी चिन्ह आहे. त्यांच्या समर्थनार्थ मतदार संघातील तरुणांसह महिला, वृद्ध प्रचाराच्या मैदानात सज्ज झाल्याचे चित्र दिसत आहे. पाचोरा-भडगाव मतदार संघात शरद ऋतूत राजकिय वातावरण तापत आहे. आमदार आणि विरोधकांना पराभूत करण्यासाठी व पाटील समाजाच्या विरोधात झालेल्या वक्तव्यामुळे बहुजन समाजाच्या मतदारांमध्ये नाराजीचा फायदा अपक्ष उमेदवार दिलीप वाघांना होऊ शकतो. या आत्मविश्वासाने, दिलीप वाघांचे समर्थक एकजुटीने त्यांचा प्रचार करत आहे.
**************************************************
तळागाळातील लोकांच्या मनात फक्त दिलीप भाऊ वाघ
**************************************************
स्व. ओंकार आप्पा वाघ यांचे वारसदार दिलीप भाऊ वाघ हे राजकारणत सक्रिय असले तरी विस टक्के राजकारण व ८० समाजकारण हा हेतू डोळ्यासमोर ठेवून दिलीप भाऊ वाघ यांनी सर्वसामान्यांसाठी सतत आवाज उठवला व थेट तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील होते व आजही आहेत. या त्यांच्या निस्वार्थी पणामुळे आजही त्यांना सगळ्यांचा मनात आदराचे स्थान आहे.
आता होऊ घातलेल्या २०२४ च्या पाचोरा, भडगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप भाऊ वाघ यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली असून ते शिट्टी या निशाणीवर निवडणूक लढवत आहेत. त्यांची उमेदवारी जाहीर झाल्यापासून त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते, तरुणवर्ग, समाजबांधव यांच्यामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असल्याचे दिसून असल्याने त्यांच्या प्रचारासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांनी स्वताहून झोकून देत पाचोरा, भडगाव शहर व तालुक्यातील गावागावात, गल्लीबोळात जाऊन दिलीप भाऊ वाघ यांनी मागील काळात केलेल्या विकासकामांची आठवण करुन देत आता निवडून आल्यानंतर काय कामे करणार आहेत याबाबत जाहिरनामा देऊन शिट्टी निशाणीवर मदतान करुन दिलीप भाऊ वाघ यांना भरघोस मतांनी विजयी करा अशी साद घालत आहेत.
यामागील कारण म्हणजे दिलीप भाऊ वाघ यांनी सत्तेवर असतांना तसेच सत्तेत नसले तरी त्यांनी लोकांच्या संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केला आहे. त्यांच्या प्रचार रॅलीत जेष्ठ नागरिक, वयोवृद्ध, महिला, पुरुष तरुणवर्ग मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत यामागील कारण म्हणजे महिला सशक्तीकरण करण्यासाठी महिला बचत गट स्थापन करुन या माध्यमातून विविध योजना राबवून महिलांना मदत मिळवून दिली असल्याने महिलावर्गातून मोठा पाठिंबा मिळाला असून दिलीप भाऊ वाघ यांना जास्तीत, जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी त्यांच्या हितचिंतकांनी कंबर कसली आहे.