स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रताप पाटील यांच्या विरोधात चौकशी करुन कारवाई करण्याचे आदेश.

दिलीप जैन.(पाचोरा)
दिनांक~१५/११/२०२४
पाचोरा, भडगाव विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता भंग केल्याचे नवनवीन किस्से समोर येत असून अशीच आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी भडगाव तालुक्यातील शिक्षणसम्राट म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रीय स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांच्या विरोधात भडगाव येथील विजय दोधा पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन केले जावे म्हणून तालुकास्तरावर निवडणूक अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. असे असले तरीही भडगाव तालुक्यातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील यांनी आचारसंहिता खुंटीला टांगून त्यांच्याच शिक्षण संस्थेतील एका कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्त सोहळ्यात मोठ्या दिमाखात हजेरी लावली असल्याने भडगाव येथील विजय दोधा पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात रितसर तक्रार दाखल केली आहे.
विजय दोधा पाटील यांच्या मते २०२४ च्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात आचारसंहिता लागू असून या कालावधीत मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार जमावबंदी कायदा कलम १४४ व ३७ (३) अंतर्गत जमावबंदी कायदा लागू असतांनाही भडगाव येथील श्री. साई मंदिर स्ट्रस्टी आवारात सेवानिवृत्ती समारंभाचे आयोजन करुन त्याठिकाणी मंचावर शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पाचोरा विधानसभा निवडणुकीत उभे असलेले महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांनी जाणूनबुजून हजेरी लावून होणाऱ्या निवडणुकीत जास्तीत, जास्त मते मिळावीत या हेतूने सेवावृत्तीचे होणारा कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या मनात तसेच सेवावृत्तीचे सोहळ्यात सहभागी लोकांची सहानुभूती मिळवून घेण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप करत विजय दोधा पाटील यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे तशी लेखी तक्रार दाखल केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
तसेच आचारसंहिता कालावधीत कुठलीही रितसर परवानगी न घेता सेवानिवृत्ती सोहळ्याचे आयोजन करुन या सेवानिवृत्ती सोहळ्यात कायद्याची जाण असलेले जिल्हापरिषद शिक्षणाधिकारी तसेच इतर जबाबदार अधिकारी उपस्थित असतांनाही त्यांनी या कायदेशीर बाबी जाणूनबुजून नजरेआड करत या सेवानिवृत्ती सोहळ्यात सामील असलेले उमेदवार प्रताप हरी पाटील यांना एकप्रकारे अभय देण्याचे काम केले असल्याचे निदर्शनास आले असल्याने सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील यांनी दिनांक १५ नोव्हेंबर २०२४ शुक्रवार रोजी भडगाव पोलीस स्टेशन व निवडणूक अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार दिली होती.
या तक्रारीची दखल घेत निवडणूक अधिकाऱ्यांनी संबंधित विभागाला चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती तक्रारदार विजय दोधा पाटील दिली असून पुढे काय कारवाई केली जाईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.